एआय तज्ज्ञांसाठी नोकऱ्याच नोकऱ्या; अभियंत्यांची तब्बल ५१ टक्के पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 12:46 PM2023-05-06T12:46:32+5:302023-05-06T12:47:04+5:30

एआयच्या सुरक्षेवरून सुरु झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओंची नुकतीच भेट घेतली.

Jobs are jobs for AI experts; As many as 51 percent posts of engineers are vacant | एआय तज्ज्ञांसाठी नोकऱ्याच नोकऱ्या; अभियंत्यांची तब्बल ५१ टक्के पदे रिक्त

एआय तज्ज्ञांसाठी नोकऱ्याच नोकऱ्या; अभियंत्यांची तब्बल ५१ टक्के पदे रिक्त

googlenewsNext

बंगळुरू - 'ओपनएआय'च्या 'चॅटजीपीटी'च्या यशानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अॅप्लिकेशन्समध्ये तज्ज्ञ असलेल्या अभियंत्यांची मागणी जगभरात वाढली आहे. भारतात त्याचा परिणाम दिसू लागला आहे. देशातील एआय अभियंत्यांची ५१ टक्के पदे सध्या रिक्त आहेत.
जगभरात एआय अभियंत्यांची जोरदार भरती केली जात आहे. आरोग्य, वित्त आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्याही एआय अभियंत्यांची भरती करीत आहेत. या संधीचा फायदा घेऊन एआय अभियंते सातत्याने नोकऱ्या बदलत आहेत. प्रत्येक नव्या नोकरीच्या वेळी त्यांना ३० ते ५० टक्के वेतनवाढ मिळत आहे. अनेक कंपन्या त्यांना दुप्पट वेतनवाढही देत आहेत.

... तर अभियंत्यांची पळवापळवी होणार
बंगळुरुमध्ये डेटा सायन्स हब उभारणारी स्टार्ट-अप कंपनी फ्लेक्सकार च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बंगळुरुत डेटा इंजीनिअर्सची संख्या भरपूर असली ती पुरेशी नाही. शहरात लवकरच एआय क्षेत्रातील तज्ज्ञ अभियंत्यांची पळवापळवी सुरू होऊ शकते.

२ लाख अभियंते हवे
नासकॉमने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ४.१६ लाख एआय अभियंते आहेत. मात्र आणखी २.१३ लाख एआय अभियंत्यांची देशाला सद्यस्थितीत गरज आहे.

एआयवरून बायडेन यांनाही चिंता
एआयच्या सुरक्षेवरून सुरु झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओंची नुकतीच भेट घेतली. गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, माइक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, ओपनएआयचे सॅम ऑल्टमन आणि अँथ्रोपिकचे डारियो अमोदी यांचा त्यात समावेश होता.. एआय तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी ते संपूर्णतः सुरक्षित आहे, याची कंपन्यांनी खात्री करावी, असे आवाहन बायडेन यांनी यावेळी केले.

 

 

Web Title: Jobs are jobs for AI experts; As many as 51 percent posts of engineers are vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.