चौघींचा व्हॉट्स ऍपवर सुसाईड ग्रुप; आत्महत्येच्या विविध मार्गांवर चर्चा, अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 09:24 PM2021-10-06T21:24:59+5:302021-10-06T21:31:32+5:30

आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर; पोलीस हादरले

Joined suicide group on WhatsApp 4 including girl committed suicide | चौघींचा व्हॉट्स ऍपवर सुसाईड ग्रुप; आत्महत्येच्या विविध मार्गांवर चर्चा, अन् मग...

चौघींचा व्हॉट्स ऍपवर सुसाईड ग्रुप; आत्महत्येच्या विविध मार्गांवर चर्चा, अन् मग...

Next

ब्रिटनच्या पोर्ट्सलँडमध्ये जंगलात एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. एमी स्प्रिंगर असं या तरुणीचं नाव असून ती २० वर्षांची आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू करताच त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. एमी आत्महत्येपूर्वी व्हॉट्स ऍपवर एका ग्रुपमध्ये सहभागी झाली होती. त्या ग्रुपमध्ये आत्महत्या करण्याच्या चांगल्या मार्गांवर चर्चा केली होती.

तरुणीच्या मृत्यूचा तपास करताना पोलिसांना आणखी तीन महिलांच्या मृतदेहांची माहिती मिळाली. या ३ महिलांदेखील आत्महत्या केल्या असल्याचं आणि त्यादेखील एमीच्याच व्हॉट्स ऍप ग्रुपमधील असल्याची माहिती तपासातून समोर आली. ऍमीसोबत तिघींनी व्हॉट्स ऍप ग्रुपवर आत्महत्यांच्या पद्धतींवर चर्चा केली. व्हॉट्स ऍपवर चर्चा करून चौघींनी आत्महत्या केली. या प्रकरणानं पोलीसदेखील चक्रावले आहेत.

आत्महत्या करण्यापूर्वी एमीनं व्हॉट्स ऍप ग्रुपवर स्वत:चं आयुष्य कसं संपवायचं याविषयी चर्चा केली. त्यानंतर तिचा मृतदेह बेनफिल्ड व्हॅली क्रिकेट क्लबजवळच्या जंगलात सापडली. पोलीस आता या व्हॉट्स ऍप ग्रुपमधील चॅटबद्दल अधिक माहिती गोळा करत आहेत.

मानसिक तणावाचा बळी
एमी बऱ्याच कालावधीपासून मानसिक तणावातून जात होती, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीमधून समोर आली आहे. बालपणीच तिच्या लहान भावाचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या कुटुंबाची स्थिती बिघडली. त्यामुळे एमीवर बराच मानसिक ताण होता. काही दिवसांपासून तिची प्रकृती सुधारली. मात्र व्हॉट्स ऍप ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर तिच्या डोक्यात आत्महत्येचे विचार सुरू झाले आणि तिला स्वत:ला संपवलं.

Web Title: Joined suicide group on WhatsApp 4 including girl committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.