शिक्षण व प्रादेशिक विभागाचे सहसंचालक एसीबीच्या जाळयात 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 09:21 PM2022-01-04T21:21:56+5:302022-01-04T21:22:30+5:30

Bribe Case :एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे टेंडर स्किन इंंटरनॅशनल कॉस्मेटोलॉजी अकॅडमीमध्ये भागीदार असून त्यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ येथे त्यांच्या अकॅडमी व त्याअंतर्गत घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कोर्सच्या मंजुरी करता जाधव यांच्या कार्यालयात अर्ज केला होता.

Joint Director of Education and Regional Department in ACB's trap | शिक्षण व प्रादेशिक विभागाचे सहसंचालक एसीबीच्या जाळयात 

शिक्षण व प्रादेशिक विभागाचे सहसंचालक एसीबीच्या जाळयात 

googlenewsNext

मुंबई : वांद्रे येथील शिक्षण व प्रादेशिक विभागाचे सह संचालक अनिल मदनजी जाधव (५२) एसीबीच्या जाळयात अडकले आहेत. वेगवेगळ्या पोहोचा मंजुरीकरिता ५ लाखांची लाच स्विकारल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे टेंडर स्किन इंंटरनॅशनल कॉस्मेटोलॉजी अकॅडमीमध्ये भागीदार असून त्यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ येथे त्यांच्या अकॅडमी व त्याअंतर्गत घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कोर्सच्या मंजुरी करता जाधव यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असून २०२१ मध्ये पूर्व मंजुरी प्राप्त झाली. याप्रकरणात अंतिम मंजुरी करता जाधव याने पाच लाखांची मागणी केली.

 तक्रारदार यांनी ७  डिसेंबर रोजी एसीबीकड़े धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार, १४ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान जाधव यांनी पैशांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, मंगळवाऱी पाच लाखांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून एसीबी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Joint Director of Education and Regional Department in ACB's trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.