पैलवानाच्या हत्येप्रकरणी जुडो प्रशिक्षकाला बेडया; दिल्ली पोलिसांनी केली अकरावी अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 04:24 PM2021-06-16T16:24:37+5:302021-06-16T16:25:16+5:30

Sushil Kumar : हा प्रमुख आरोपी कुस्तीपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार आहे.

Judo coach handcuffed in wrestler murder case; Eleven arrests made by Delhi Police | पैलवानाच्या हत्येप्रकरणी जुडो प्रशिक्षकाला बेडया; दिल्ली पोलिसांनी केली अकरावी अटक 

पैलवानाच्या हत्येप्रकरणी जुडो प्रशिक्षकाला बेडया; दिल्ली पोलिसांनी केली अकरावी अटक 

Next
ठळक मुद्देदिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुभाषला दिल्लीतून अटक केली, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गेल्या महिन्यात राजधानी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये राष्ट्रीय कुस्तीपटू सागर धनकड  यांच्या हत्येप्रकरणी दिल्लीपोलिसांनी सुभाष नावाच्या जूडो प्रशिक्षकाला बुधवारी अटक केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेला हा अकरावा आरोपी आहे. हा प्रमुख आरोपी कुस्तीपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार आहे. (Judo coach handcuffed in wrestler murder case)

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुभाषला दिल्लीतून अटक केली, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  सागर धनखड याच्या हत्येच्या आरोपाखाली ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटूसुशील कुमार (Sushil Kumar) सध्या दिल्लीतील मंडोली तुरुंगात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यामध्ये आतापर्यंत गँगस्टर कनेक्शन समोर आले आहे. मात्र आता तपासामधून अधिक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, ४ आणी ५ मेच्या रात्री दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सुशील कुमार आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पोहोचला. तिथे त्याने मारहाण केली. या मारहाणीमध्ये पैलवान सागर धनखड गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर पुढच्याच दिवशी सुशील कुमार फरार झाला होता.  

दरम्यान, १७ दिवसांनंतर २३ मे रोजी सुशील कुमार याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली. दरम्यान, या हत्याकांडाशी संबंधित अनेक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. 

Web Title: Judo coach handcuffed in wrestler murder case; Eleven arrests made by Delhi Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.