जुहू पोलिसांकडून ५८ किलो गांजा हस्तगत; तेलंगणाच्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 09:29 PM2021-07-17T21:29:47+5:302021-07-17T21:30:02+5:30
विलेपार्लेच्या नेहरुनगर झोपडपट्टीमध्ये अंमली पदार्थाचा साठा करण्यात आल्याची माहिती जुहू पोलिसांना मिळाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: जुहू पोलिसांनी एका विशेष कारवाई अंतर्गत ५८ किलो गांजा हस्तगत केला आहे. ज्याची किंमत जवळपास ११ लाख रुपये असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असुन त्यातील एकाचा तेलंगणा मधुन गाशा गुंडाळण्यात आला आहे.
विलेपार्लेच्या नेहरुनगर झोपडपट्टीमध्ये अंमली पदार्थाचा साठा करण्यात आल्याची माहिती जुहू पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोरे, मासवेकर , पोलीस उपनिरीक्षक धवले, रक्षे, पाटील आणि पथकाने त्याठिकाणी सापळा रचत मोहन राठोड (४८) याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत तामिळनाडूतील त्याचा साथीदार मारुती जनबंधु (६५) याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला तामिळनाडूतुन अटक करण्यात आली. त्याच्या झडतीत पोलिसांनी ५७ किलो गांजा हस्तगत केला आहे.
जो व्यवसायीक उद्देशाने त्याने सोबत ठेवला होता अशी माहिती असुन त्याची बाजारातील किंमत ११ लाख ५४ हजार रुपये असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. जनबंधु राठोड याला गांजा पुरवत असून त्याचे कोणी साथीदार आहेत का याबाबत जुहू पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.