धनादेश देण्यासाठी लाच घेणारा कनिष्ठ लेखा अधिकारी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:44 PM2021-05-05T16:44:37+5:302021-05-05T16:44:59+5:30
Bribe case: मनोज जाधव असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
href='https://www.lokmat.com/topics/washim/'>वाशिम : कंत्राटी रोजगार सेवकाच्या थकीत मानधन देयकाचा धनादेश तयार करून कॅश रजिस्टरला नोंद घेण्यासाठी १५०० रुपयांची लाच मागणारा मालेगाव पंचायत समितीचा कनिष्ठ लेखा अधिकारी ५ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. मनोज बिबीचंद जाधव (३३) असे लाचखोर अधिकाºयाचे नाव आहे.कंत्राटी रोजगार सेवकाचे मागील आठ महिन्यांपासून मानधन रखडले होते. मानधन देयकाचा धनादेश तयार करून कॅश रजिस्टरला नोंद घेण्यासाठी मालेगाव पंचायत समितीचा कनिष्ठ लेखा अधिकारी मनोज बिबीचंद जाधव याने तक्रारदारास १५०० रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणी केली असता १५०० रुपयांची लाच मागितल्याचे आढळून आले. ५ मे रोजी पंचायत समितीच्या लेखा विभागात सापळा रचला असता आरोपीला लाच रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपीला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्यात आला.