हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 06:52 PM2019-07-24T18:52:50+5:302019-07-24T18:55:07+5:30

२६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि 'जमात-उद-दावा'चा प्रमुख हाफिज सईदला अटक करण्यात आली आहे. 

Juridial Custody for 14 days to Hafiz Saeed | हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

Next
ठळक मुद्देपाकिस्तानमधील  गुजरानवाला न्यायालयात सुनावणीदरम्यान ही कोठडी सुनावण्यात आली आहे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पहिल्या अमेरिका दौऱ्यावर जाणार होते असून त्याआधी ही कारवाई करण्यात आली. 

इस्लामाबाद - हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधील  गुजरानवालान्यायालयात सुनावणीदरम्यान ही कोठडी सुनावण्यात आली आहे. दहशतवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या आरोपांवरून पाकिस्तानच्यादहशतवादविरोधी विभागाने मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि 'जमात-उद-दावा'चा प्रमुख हाफिज सईदला अटक करण्यात आली आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पहिल्या अमेरिका दौऱ्यावर जाणार होते असून त्याआधी ही कारवाई करण्यात आली.  हाफिज सईद याच्याविरोधात दहशतवादाचे अनेक आरोप असून, २६/११ मुंबईवरील हल्ल्याचा तो प्रमुख सूत्रधार आहे. अमेरिकेनेही सईदवर एक कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र, तो लाहोर शहरामध्ये मोकाट फिरत होता असून त्याच्यावर ठोस कारवाई होत नव्हती. दरम्यान, तीन जुलै रोजी दहशतवादविरोधी पथकाने हाफिज सईदसह 'जमात उद दावा'च्या १३ जणांविरोधात २३ फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये दहशतवाद्यांना वित्तपुरवठा केल्याचा प्रमुख आरोप असून, पंजाब प्रांतातील विविध शहरांमध्ये या फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणांमध्ये अटकपूर्व जामीन घेण्यासाठी लाहोरवरून गुजरानवालाकडे जात असताना हाफिजला अटक करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. त्यानंतर त्याला दहशतवादविरोधी कोर्टात सादर करण्यात आले, तेथे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.



 

Web Title: Juridial Custody for 14 days to Hafiz Saeed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.