अवघ्या ३० हजार रुपयांसाठी बँक अधिकाऱ्याची हत्या, दुचाकीच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी हवे होते पैसे 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 08:55 PM2018-09-10T20:55:58+5:302018-09-10T20:56:13+5:30

For just 30 thousand rupees, the bank officer's death was needed to pay for a two-wheeler loan | अवघ्या ३० हजार रुपयांसाठी बँक अधिकाऱ्याची हत्या, दुचाकीच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी हवे होते पैसे 

अवघ्या ३० हजार रुपयांसाठी बँक अधिकाऱ्याची हत्या, दुचाकीच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी हवे होते पैसे 

Next

मुंबई - ईएमआयवर घेतलेल्या दुचाकीचे कर्ज चुकविण्यासाठी सिद्धार्थ संघवी या एचडीएफसी बँकेच्या उपाध्यक्षाची गळा चिरून हत्या केल्याची कबूली  20 वर्षीय आरोपी रईस उर्फ सरफराज शेख याने न्यायालयात दिली. न्यायालयाने या प्रकरणी त्याला 19 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मूळचा नवी मुंबईतील रहिवाशी असलेला सरफराज हा संघवी यांच्या लोअर परळच्या कमला मिल कंपाऊंडमध्येच बिगारीचे काम करायचा. त्यामुळे दोघांची तोंडओळख झाली होती. काही महिन्यांपूर्वी सरफराजने दुचाकी ईएमआयवर घेतली होती. या कर्जाचे हप्ते ही थकलेले होते. घरातील खर्च आणि दुचाकीचे हप्ते मिळणाऱ्या मिळकतीत भागवणे शक्य होत नसल्याने दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर डोईजड होत होता. यातूनच चाकूचा धाक दाखवून कुणाकडून तरी पैसे उकळून कर्ज भागवण्याचे सरफराजने ठरवले होते. संघवी कार्यालयात कायम सकाळी 9 पर्यंत यायचे तर रात्री 8 पर्यंत निघायचे. तोंड ओळख असलेले संघवी हे बँकेत मोठ्या हुद्यावर असल्याची कल्पना सरफराजला होती. 

कार्यालयाच्या पार्किंगमध्येच केली सिद्धार्थ संघवींची हत्या 

बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याला लुटल्यास मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. या दृष्टीने त्याने संघवी यांना लुटण्याचा कट रचला. संघवी यांचे कार्यालय असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एचडीएफसी बँकेचे पार्किंग होते. त्या ठिकाणी सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंतच सुरक्षा रक्षक आलेल्या आणि गेलेल्या गाड्यांची नोंदी ठेवतो. त्या पार्किंग परिसरात सीसीटिव्ही नाहीत. त्यामुळे संघवी कार्यालयाबाहेर पडतात. त्यावेळी कोणताही सुरक्षा रक्षक नसतो. हिच संधी साधून सरफराजने 5 सप्टेंबर रोजी संघवी यांना इमारतीच्या पार्किंग परिसरात रात्रीच्या 8 च्या सुमारास गाठले. चाकूच्या धाकावर पैसे मागितल्यानंतर संघवी यांनी पोलिसांची भिती दाखवली. त्यावेळी भेदरलेल्या सरफराजने संघवी यांना काही कळू न देता त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. संघवी यांची गळा चिरून हत्या केल्यानंतर सरफराजने संघवी यांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून संघवी यांच्या गाडीच्या मागच्या सिटवर ठेवला.

पोलिसांनी सिमकार्डच्या मदतीने आरोपीची शोध घेतात. त्यामुळे सरफराजने संघवी यांचा फोन घेऊन तो बंद केला. संघवीचा मृतदेह सरफराजने कल्याणच्या हाजी मलंग रोडवरील काकडवाला गावाजवळील नाल्यात फेकला. तेथून गाडी नवी मुंबईच्या कोपरखैराने येथील पार्किंगमध्ये लावून सरफराजने घरी पळ काढला. मात्र, संघवी बेपत्ता असल्याची बातमी सर्व प्रसार माध्यमांनी उचलून धरल्यानंतर संघवी यांच्या घरातले, पोलिसांची मदत घेतील या उद्देशाने प्रकरण निवाळण्यासाठी संघवी यांच्या मोबाइलमधील सिमकार्ड काढून त्यात दुसरे सिमकार्ड टाकून सरफराजने संघवींच्या घरातल्यांना फोन केला. फोनवर त्याने "सिद्धार्थ सर सुखरूप आहे काळजी करण्याची गरज नाही" असे सांगून फोन कट केला.नेमका याच फोनमुळे सरफराज पोलिसांच्या आयता जाळ्यात सापडला. सरफराजकडे केलेल्या चौकशीतून त्याने संघवीच्या हत्येची कबूली पोलिसांना तसेच न्यायालयात दिली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी हस्तगत केलेल्या संघवी यांच्या गाडीवर देखील सरफराजच्या हाताचे ठसे, संघवी यांच्या रक्ताचे शिंतोडे आढळून आले असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: For just 30 thousand rupees, the bank officer's death was needed to pay for a two-wheeler loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.