मसाज करायला गेला अन् सेक्स करण्यास नकार दिल्याने हाडं मोडून आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 17:22 IST2020-02-07T17:20:58+5:302020-02-07T17:22:54+5:30
पोलिसांनी याप्रकरणी चारही आरोपींना अटक केली आहे.

मसाज करायला गेला अन् सेक्स करण्यास नकार दिल्याने हाडं मोडून आला
दुबई - दुबईतील मसाज पार्लरमध्ये पुरुषाने सेक्स करण्यात नकार दिल्यानं त्याला मसाजऐवजी हाडं मोडून घ्यावी लागली आहेत. सेक्स करण्यास नकार दिल्याने त्या युवकाला चार जणांनी मारहाण केली. त्यामुळे त्याची हाडे मोडली. तेथील पोलिसांनी याप्रकरणी चारही आरोपींना अटक केली आहे.
व्हिएतनाममध्ये राहणाऱ्या या आरोपींमध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश होता. दुबईतील ज्या फ्लॅटमध्ये हे आरोपी राहतात तिथे ते मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेटचा गोरखधंदा चालवत होते. एक व्यक्ती मसाज करून घेण्यासाठी त्यांच्या पार्लरमध्ये पोहोचला. त्याने शरीराला मालिश करण्यासाठी ४०० दिरहॅम पैसे दिले. त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, पार्लरमध्ये जाताच कपडे उतरविल्यानंतर त्याला अंग झाकण्यास टॉवेलसुद्धा देण्यात आले नाही. त्यानंतर मालिश करण्याऐवजी एक महिला आली आणि सेक्स करण्याबद्दल बोलू लागली. पीडित व्यक्तीने सांगितले की, त्याने महिलेला स्पष्टपणे सांगितले की, त्याला लैंगिक संबंध ठेवायचे नसून केवळ मालिश करावे. यानंतर त्याने ४०० दिरहॅम हे दिलेले पैसे परत मागितल्यानंतर वादाला सुरुवात झाली.
धक्कादायक! स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट; पोलिसांनी टाकला छापा
त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितलेमाहिती देत सांगितले की, तेथे आणखी एका मुलीसह इतर तीन लोक आहेत. चौघांनी मिळून त्याला मारहाण करण्यास सुरवात केली आणि त्याला स्टीलच्या ट्यूबनेसुद्धा मारहाण केली. या प्रकरणी दुबईतील अलारफा पोलीस ठाण्याध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि मालिश पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या शरीराविक्रीचा व्यवसाय केल्याचा आरोपही आरोपींवर करण्यात आला आहे. युवकाला मारहाण व शरीरविक्री करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेल्या चौघांपैकी दोन पुरुष आहेत. ज्यांची वयं १८ आणि ३९ वर्षे आहेत, तर दोन्ही महिलांची वयं ३३ आणि ३५ वर्षे आहेत.