प्रेमीयुगुलास पंचायतीची अमानवीय शिक्षा, चपलांचा हार घालून गावात फिरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 01:30 PM2021-09-29T13:30:46+5:302021-09-29T13:31:33+5:30
गौर ठाणे परिक्षेत्रातील एका गावात दलित अल्पवयीन युवक-युवतीला चपप्लांची माळा घालून, तोंडावर काळ फासून लोकांनी गावातून फिरवले. पोलिसांनी हे प्रकरण अधिक गंभीरतेनं घेतलं असून 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये एक मानवीय घटना घडल्याचे समोर आले आहे. एका अल्पवयीन प्रेमीयुगलाच्या गळ्यात चप्पलांचा हार घालून त्यांना गावातून फिरवण्यात आले. विशेष म्हणजे पंचायतीनेचे हे तुघलकी फर्मान काढले होते. त्यामुळे, पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, उच्चसुशिक्षित आणि जागरुक नागरिकांवरही प्रश्न विचारला जात आहे. अजूनही गाव-खेड्यात सुरू असलेल्या खाप पंचायतींच्या हुकमशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
गौर ठाणे परिक्षेत्रातील एका गावात दलित अल्पवयीन युवक-युवतीला चपलांची माळा घालून, तोंडावर काळ फासून लोकांनी गावातून फिरवले. पोलिसांनी हे प्रकरण अधिक गंभीरतेनं घेतलं असून 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, याप्रकरणी आत्तापर्यंत 5 जणांना अटकही करण्यात आली आहे. पीडित अल्पवयीन जोडपं आपत्तीजनक अवस्थेत गावकऱ्यांना दिसून आलं होतं. त्यामुळे, गावकऱ्यांनी त्यांना गाव पंचायतीसमोर उभे केलं. गाव पंचायतीने त्यांना ही मानवतेला काळीमा फासणारी शिक्षा सुनावली.
उत्तरप्रदेश के बस्ती में दलित नाबालिग प्रेमी युगल को भरी पंचायत में तालीबानी फरमान सुनाया गया। जिसमें प्रथम उनके चेहरे पर कालिख पोता गया। गले में चप्पलों की माला पहनाई गई। बाद में पूरे गांव में जुलुस निकाला गया। मैं उम्मीद करूंगा इस घटना पर सीएम @myogiadityanath दो शब्द बोलेंगे। pic.twitter.com/dYf6aDi7Q4
— Hansraj Meena (@HansrajMeena) September 29, 2021
गाव पंचायतीच्या या निर्णयाविरुद्ध आता सोशल मीडियातूनही आवाज उठविण्यात येत आहे. समाजमाध्यमांमध्ये या जोडप्याचे फोटो व्हायरल झाले असून लोकांनी संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.