कुटुंबासोबत राहूनही बनतात बालगुन्हेगार; जाणून घ्या, तुमचा मुलगा काय करतो ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 08:03 AM2022-12-03T08:03:08+5:302022-12-03T08:03:55+5:30

धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक बालगुन्हेगार हे पालकांसोबतच राहतात.

Juveniles become delinquents even while living with family; Know what your son does? | कुटुंबासोबत राहूनही बनतात बालगुन्हेगार; जाणून घ्या, तुमचा मुलगा काय करतो ?

कुटुंबासोबत राहूनही बनतात बालगुन्हेगार; जाणून घ्या, तुमचा मुलगा काय करतो ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वडाळ्यातील महापालिकेच्या एका शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यांकडून वर्गमैत्रिणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने सर्वांनाच सुन्न केले. एनसीआरबीच्या २०२१ च्या अहवालातील आकडेवारी पाहता देशातील बालगुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरत आहे. हलाखीची कौटुंबिक स्थिती, पालकांचे दुर्लक्ष, वाईट संगत आणि जडलेली व्यसने, त्यात नेटवर्किंगबरोबर पॉर्नचे वाढते जाळे यामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या वाटेकडे वळताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक बालगुन्हेगार हे पालकांसोबतच राहतात.

मुंबई चौथ्या क्रमांकावर 
n गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, बालगुन्हेगारीत दिल्ली (२,६१८), चेन्नई (४९६), अहमदाबाद (३८६) पाठोपाठ मुंबईचा (३३२) चौथा क्रमांक लागतो. 
n २०२० मध्ये मुंबईत ३३२ गुह्यांची नोंद झाली. २०१९ (६११) आणि २०१८ (८६३) च्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. या गुन्हेगारीत १६ ते १८ वयोगटातील बालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

हलाखीची कौटुंबिक स्थिती, पालकांचे दुर्लक्ष आणि जडलेली व्यसने, त्यात नेटवर्किंगबरोबर पॉर्नचे वाढते जाळे यामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या वाटेकडे वळताना दिसत आहेत. 

Web Title: Juveniles become delinquents even while living with family; Know what your son does?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.