सोन्याचे नकली दागिने देऊन सराफाला गंडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 07:35 PM2021-10-03T19:35:23+5:302021-10-03T19:35:32+5:30

सोन्याचे दागिने गहाण ठेवायचे आहे असे सांगत त्यांनी २ अंगठी व १ रिंग असे १४ ग्रॅम वजनाचे दागिने आणि सोबत ते दागिने खरेदी केल्याची पावती दाखवली. माळी यांनी दागिने व पावती पाहून त्यांना ४० हजार रुपये दिले. 

The jweller was ruined by giving fake gold ornaments | सोन्याचे नकली दागिने देऊन सराफाला गंडवले

सोन्याचे नकली दागिने देऊन सराफाला गंडवले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड - दागिने गहाण ठेवायचे सांगून चक्क नकली दागिने देऊन भाईंदरच्या एका सराफास  बंटी - बबलीने गंडवल्याचा प्रकार घडला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भाईंदर पश्चिमेच्या मुर्धागाव येथे सुंदर माळी यांचे सूर्या गोल्ड ज्वेलर्स हे सराफा दुकान आहे. ३० सप्टेंबर रोजी स्वतःचे नाव अकबर हुसेन अन्सारी व सन्ना अकबर अन्सारी असे सांगणारे पुरुष आणि महिला हे सोन्याचे दागिने गहाण ठेवायचे म्हणून दुकानात आले. 

सोन्याचे दागिने गहाण ठेवायचे आहे असे सांगत त्यांनी २ अंगठी व १ रिंग असे १४ ग्रॅम वजनाचे दागिने आणि सोबत ते दागिने खरेदी केल्याची पावती दाखवली. माळी यांनी दागिने व पावती पाहून त्यांना ४० हजार रुपये दिले. सायंकाळी ते दागिने पेढीवर ठेवण्यासाठी माळी गेले असता पेढी मालकाने ते दागिने तपासून पाहता ते खोटे असल्याचे आढळून आले. दागिन्यांना सोन्याचा मुलामा दिलेला होता. 

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच माळी यांनी त्त्यांना पुन्हा दुकानात येण्यास सांगितले पण ते काही आले नाहीत. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात बंटी - बबली विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: The jweller was ruined by giving fake gold ornaments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.