अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्ता आजपासून कबड्डी स्पर्धा, व्हायरल झाले बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 12:18 PM2023-01-14T12:18:22+5:302023-01-14T12:21:30+5:30

Chota Rajan : ही कबड्डी स्पर्धा 14 आणि 15 जानेवारीला 6 वाजता आयोजित केली आहे. हे बॅनर सीआर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य मुंबईकडून लावण्यात आले आहेत. सीआर म्हणजे छोटा राजन.

Kabaddi match on birthday of gangster chhota rajan banner viral | अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्ता आजपासून कबड्डी स्पर्धा, व्हायरल झाले बॅनर

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्ता आजपासून कबड्डी स्पर्धा, व्हायरल झाले बॅनर

googlenewsNext

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील मालाडमध्ये कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या स्पर्धेचे बॅनर सगळीकडे लावण्यात आले आहेत. कबड्डी सामना मालाडच्या तानाजी नगरमध्ये गणेश मैदान कुरार गावात होणार आहे. बॅनरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही कबड्डी स्पर्धा 14 आणि 15 जानेवारीला 6 वाजता आयोजित केली आहे. हे बॅनर सीआर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य मुंबईकडून लावण्यात आले आहेत. सीआर म्हणजे छोटा राजन.

गॅंगस्टर छोटा राजनला 2020 मध्ये शुभेच्छा देण्याची घटना समोर आली होती. या आरोपात महाराष्ट्र पोलिसांनी काही लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता.  या लोकांनी ठाणे शहरात दोन ठिकाणी बॅनर लावले होते.

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये डबल मर्डर केसमध्ये मुंबई कोर्टाच्या विशेष सीबीआय कोर्टाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसहीत 4 आरोपींना निर्दोष सोडलं होतं. 2010 मध्ये छोटा शकील गॅंगचा आसिफ दधी उर्फ शकील मोदकची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी छोटा राजनवर प्लान करण्याचा आरोप लागला होता. 

त्याशिवाय याप्रकरणी मोहम्मद अली जान, प्रणय राणे आणि उम्मेदी सुद्धा आरोपी होता. पण सरकारी वकील हा गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरले. पुरावे आणि हत्यारे मिळाली नसल्याने आरोपींना सोडण्यात आलं होतं. हे आरोपी 12 वर्षापासून तुरूंगात होते.

Web Title: Kabaddi match on birthday of gangster chhota rajan banner viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.