Kanchana 3 Actress: कंचना 3 मधील रशियन अभिनेत्री अलेक्झांड्रा डिजावीची गोव्यात आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 12:19 PM2021-08-24T12:19:23+5:302021-08-24T12:26:30+5:30

Alexandra Djavi Suicide: Alexandra सोबत तिचा बॉयफ्रेंडही राहत होता. त्याचा जबाब पोलिसांनी नोंदविला असून घटनेवेळी तो बाहेर गेला होता.

kanchana 3 Russian actress Alexandra Djavi found dead in Goa | Kanchana 3 Actress: कंचना 3 मधील रशियन अभिनेत्री अलेक्झांड्रा डिजावीची गोव्यात आत्महत्या

Kanchana 3 Actress: कंचना 3 मधील रशियन अभिनेत्री अलेक्झांड्रा डिजावीची गोव्यात आत्महत्या

googlenewsNext

तामिळ सिनेमा कंचना 3 (kanchana 3 actress) मध्ये भूमिका केलेल्या 24 वर्षीय रशियन अभिनेत्रीने गोव्यात आत्महत्या केली आहे. अलेक्झांड्रा डिजावी (Alexandra Djavi) असे तिचे नाव असून ती राहत असलेल्या भाड्याच्या घरामध्ये अन्य एका तरुणीसोबत तिचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. 20 ऑगस्टला तिचा मृतदेह सापडला होता. मात्र, सोमवारी तिची ओळख पटली. गोवा पोलिसांनी रशियाच्या दुतावासाशी संपर्क केला असून पोस्ट मार्टेमसाठी त्यांच्या परवानगीची वाट पाहत आहेत. (kanchana 3 actress Alexandra Djavi found dead in Goa.)

Alexandra सोबत तिचा बॉयफ्रेंडही राहत होता. त्याचा जबाब पोलिसांनी नोंदविला असून घटनेवेळी तो बाहेर गेला होता. तिचा मृत्यू हा गोव्याचे नाव अंतरराष्ट्रीय स्तरावरही खराब करणारा ठरला आहे. या अभिनेत्रीचा व आणखी एका महिलेचा २० ऑगस्ट रोजी गोव्यात ओशल येथे मृतदेह संशयास्पदरीत्या आढळले होते. या प्रकरणातील पोलीस तपासातून तरी सध्या यात काहीच घातपाताची शक्यता असल्याचा निष्कर्ष काढलेला नाही. परंतु तशी शक्यता नाकारताही येत नाही.

'ती' वेगळी...
हणजूण मयत अलेझेंड्रा री डिजावी हिचा कोणत्याही विनयभंगाच्या तक्रारीशी काही संबंध नाही. तसेच तामिळनाडू पोलिसांनी संपर्क साधलेला नाही, अलेझेंड्रा ही मायदेशी असताना तिच्या नावाने कोणीतरी खोटी तक्रार २०१८ मध्ये दिली होती, अशी माहिती हणजूण पोलीस निरीक्षक सुरज गावस यांनी दिली. अलेझेंड्रा हिचा संबंध चित्रपट जगताशी असला तरी ती सध्या चित्रपटात काम न करता प्रमोशन करीत असे. मात्र, हल्ली तिच्याकडे काम नसल्याने ती मानसिक तणावाखाली होती. तिच्यावर मुंबईत उपचारही सुरू होते; पण कोरोनामुळे उपचाराकरिता तिला मुंबईला जाता आले नव्हते. चेन्नई येथे काम करताना तिच्या अपरोक्ष कोणीतरी तिच्या नावाचे साम्य असलेल्या युवतीने २०१८ मध्ये विनयभंगाची तक्रार केली होती. या अलेझेंड्राचा या तक्रारीचा काही संबंध नाही, अशी माहिती तिच्या प्रियकराने सांगितल्याचे निरीक्षक गावस यांनी सांगितले. तिने मानसिक तणावाने आत्महत्या केल्याचे लॅपटॉपवरील माहितीवरून निष्पन्न होते.

Web Title: kanchana 3 Russian actress Alexandra Djavi found dead in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.