Kandivali Vaccine scam: कांदिवलीच्या बोगस लसीकरणाचा आरोपी बारामतीत लपलेला; राजेश पांडेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 08:27 AM2021-07-01T08:27:40+5:302021-07-01T08:28:08+5:30

Mumbai fake vaccine camp case: दोन दिवसांपूर्वीच याप्रकरणी डॉ. मनीष त्रिपाठीने आत्मसमर्पण केले होते. या प्रकरणात या महत्वाच्या अटक समजल्या जात असुन यामुळे तपासाला गती मिळणार असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.

Kandivali fake vaccination accused arrested from Baramati; Rajesh Pandey caught by police | Kandivali Vaccine scam: कांदिवलीच्या बोगस लसीकरणाचा आरोपी बारामतीत लपलेला; राजेश पांडेला अटक

Kandivali Vaccine scam: कांदिवलीच्या बोगस लसीकरणाचा आरोपी बारामतीत लपलेला; राजेश पांडेला अटक

Next

Kandivali Vaccine scam: मुंबई: कांदिवली बोगस लसीकरण प्रकरणी कोकीलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाचा कर्मचारी राजेश पांडे (Rajesh Pandey) याच्याही मुसक्या मुंबई पोलिसांनी गुरुवारी आवळल्या आहेत. त्याला बारामतीमधून ताब्यात घेण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. (Rajesh Pandey arrested in Mumbai fake vaccine camp case from Baramati.)

याप्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच याप्रकरणी डॉ. मनीष त्रिपाठीने आत्मसमर्पण केले होते. या प्रकरणात या महत्वाच्या अटक समजल्या जात असुन यामुळे तपासाला गती मिळणार असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. कांदिवलीतील हिरानंदानी हेरीटेज सोसायटीमध्ये ३० मे, २०२१ रोजी हे लसीकरण करण्यात आले होते ज्यात ३९९ जणांना ही लस दिल्याचे उघड झाले.
 

Web Title: Kandivali fake vaccination accused arrested from Baramati; Rajesh Pandey caught by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.