कांदिवली बनावट लसीकरण: मास्टरमाईंड डॉ. मनीष त्रिपाठी पोलिसांसमोर आत्मसमर्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 02:40 PM2021-06-29T14:40:55+5:302021-06-29T14:41:37+5:30
Kandivali Fake Vaccination :डॉ. त्रिपाठीच्या अटकेमुळे आता यातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुंबई - कांदिवली बोगस लसीकरणातील मास्टरमाइंड डॉ. मनीष त्रिपाठी याचा जामीन सोमवारी दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानुसार त्याने मंगळवारी कांदिवली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे वकील ऍड. आदिल खत्री आणि कुटुंबीय देखील हजर होते.
माझे अशील डॉ. त्रिपाठी हे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास दंडाधिकारी अथवा परिमंडळ अकाराचे पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयात आत्मसमर्पण करतील आहेत', असे ऍड खत्री यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले होते. त्यानुसार आज कांदिवली पोलीस ठाण्यात सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांनी हे आत्मसमर्पण करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. कांदिवलीतील हिरानंदानी हेरीटेज सोसायटीमध्ये ३० मे, २०२१ रोजी हे बोगस लसीकरण करण्यात आले होते. डॉ. त्रिपाठीच्या अटकेमुळे आता यातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Maharashtra | Dr Manish Tripathi surrendered to Kandivali Police in connection with Mumbai fake vaccine camp case: Mumbai Police
— ANI (@ANI) June 29, 2021