कांदिवली जीन्स फॅक्टरी आगप्रकरणी एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 10:55 PM2018-12-25T22:55:57+5:302018-12-25T23:00:02+5:30
याप्रकरणी मालकाची सोमवारी (ता. 24) पहाटे त्यांचे मृतदेह सापडले. राजू विश्वकर्मा (30), राजेश विश्वकर्मा (36), भावेश पारेख (51) आणि सुदामा सिंग (36) अशी मृतांची नावे असून याप्रकरणी समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी मालक रवी डहाणू(43) याला अटक केली
मुंबई - कांदिवली येथील दामू नगर परिसरात रविवारी जीन्स फॅक्टरीला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर याप्रकरणी मालकाला पोलिसांनीअटक केली. आरोपीविरोधात भा. दं. वि. कलम 304(अ) अंतर्गत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मालकाची सोमवारी (ता. 24) पहाटे त्यांचे मृतदेह सापडले. राजू विश्वकर्मा (30), राजेश विश्वकर्मा (36), भावेश पारेख (51) आणि सुदामा सिंग (36) अशी मृतांची नावे असून याप्रकरणी समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी मालक रवी डहाणू(43) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे. याप्रकरणी गाळा भाड्याने देणाऱ्या एका व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गारमेंटमध्ये बेकायदा मजल्याचे बांधकाम सुरू होते. त्या वेळी वेल्डिंगचे काम सुरू असताना ठिणगी उडाल्याने आग लागल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अग्निशमन दलाने सोमवारी घटनास्थळाची पाहाणी करून काही नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
या फॅक्टरीत बेकायदा मजला बांधण्यासाठी वेल्डिंगचे काम सुरू होते. त्याची ठिणगी कपड्यांचा रंग असलेल्या पिंपावर उडाली आणि त्यातून आगीचा भडका उडाला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीमुळे गोदामाचे बांधकाम कोसळले. त्यानंतर जेसीबी आणि इतर यंत्राच्या साहाय्याने पहाटेपर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. सोमवारी पहाटे या चौघांचे मृतदेह सापडले होते.
कांदिवली येथील दामू नगर परिसरात रविवारी जीन्स फॅक्टरीला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर याप्रकरणी मालकाला पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात भा. दं. वि. कलम 304(अ) अंतर्गत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 25, 2018