कणेरकर आत्महत्या; सहा पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 05:52 AM2019-08-31T05:52:17+5:302019-08-31T05:52:38+5:30
कणेरकर यांच्या पत्नीने याबाबत तक्रार केली होती.
अलिबाग : सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाºया मुंबई राज्य गुप्त वार्ता नियंत्रण कक्षातील सहा पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कणेरकर यांच्या पत्नीने याबाबत तक्रार केली होती. कणेरकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्यासोबत काम करणाºया अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिली होती. आपल्याच सहकाºयांनी चोरीचा आरोप लावल्याने नैराश्य व शेरेबाजीला कंटाळून कणेरकर यांनी आत्महत्या केली असल्याचे आता समोर आले आहे.
अलिबाग पोलीस ठाण्यातील एडीसी नम्रता अलकनुरे, प्रशांत लांगी, स. आ. इनामदार, आर. व्ही. शिंदे, विजय बनसोडे आणि रवींद्र साळवी या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप यातील कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
१६ आॅगस्ट २०१९ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अलिबागच्या पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहमधील रूम नंबर पाचमध्ये सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी कणेरकर यांनी आत्महत्या का करतो याबाबत सुसाईड नोट लिहून ठेवली होती. अलिबाग पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी जलदगतीने तपास करण्याचे आदेश अलिबाग पोलिसांना दिले होते. कणेरकर यांनी सुसाईड नोटमध्ये काय मजकूर लिहिला होता याबाबत पोलिसांनी गुप्तता राखली होती. मात्र सुसाईड नोटमध्ये काही अधिकाºयांची नावे असल्याचे पोलिसांनी कबूल केले होते.
आत्महत्येचे मूळ कारण
प्रशांत कणेरकर हे राज्य गुप्त वार्ता विभाग नियंत्रण कक्ष मुंबई येथे सेवेत रु जू असताना २०१८ मध्ये त्यांचे सह अधिकारी प्रशांत लांगी यांचे पाकीट चोरीला गेले. आपले पाकीट चोरीला गेल्याचा आरोप प्रशांत लांगी यांनी प्रशांत कणेरकर यांच्यावर केला होता. नुसता तोंडी आरोप न करता तशा आशयाची लेखी तक्र ार प्रशांत लांगी यांनी एडीसी अलकनुरे यांच्याकडे केली होती. लांगी यांनी केलेल्या तक्र ारीच्या आधारे अलकनुरे यांनी प्रशांत कणेरकर यांना मेमो दिला आणि लेखी उत्तर देण्यास सांगितले. त्यानंतर काढलेला मेमो प्रशांत कणेरकर यांना दिला नाही. अलकनुरे, प्रशांत लांगी, स.आ. इनामदार, आर. व्ही. शिंदे, विजय बनसोडे आणि रवींद्र साळवी यांनी प्रशांत कणेरकर यांना या प्रकरणावरून टोमणे मारण्यास सुरु वात केली होती. वारंवार शेरेबाजी करून त्यांच्यावर चोरी केल्याचा आरोप करण्यास सुरु वात केली होती. त्यानंतर त्यांची रायगड पोलीस दलात बदली झाली होती.