Kangana Ranaut: कंगनाच्या बॉडीगार्डला अटक; लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, फसवणुकीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 04:12 PM2021-05-30T16:12:22+5:302021-05-30T16:13:41+5:30
Kangana Ranaut's bodyguard Kumar Hegde: पोलीस अधिकाऱ्यांनी न्यूज एजन्सी पीटीआयला सांगितले की, मुंबई पोलिसांच्या एका टीमने शनिवारी कुमार हेगडेला मंड्याच्या हेगडाहळ्ळी येथून अटक केली आहे. त्याने पीडित महिलेशी संपर्क तोडला होता.
बॉलीवूडची (Bollywood) वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) बॉडीगार्डला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. कंगनाचा बॉडीगार्ड कुमार हेगडेवर (Bodygaurd Kumar Hegde) वर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा मुंबईतील डीएन नगर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. एका मेक अप आर्टिस्टने हे आरोप केले आहेत. हेगडेला त्याच्या गावातून अटक करण्यात आली आहे. (Kangana Ranaut's bodyguard arrested in Mandya over allegation of rape)
पोलीस अधिकाऱ्यांनी न्यूज एजन्सी पीटीआयला सांगितले की, मुंबई पोलिसांच्या एका टीमने शनिवारी कुमार हेगडेला मंड्याच्या हेगडाहळ्ळी येथून अटक केली आहे. त्याने पीडित महिलेशी संपर्क तोडला होता. यामुळे त्या महिलेने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याने तिच्याकडून 50000 रुपये घेतले परंतू परत केले नसल्याचा आरोपही तिने केला आहे.
या ३० वर्षांच्या ब्यूटीशियनने कंगनाच्या बॉडीगार्डंवर गंभीर आरोप केले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. गेल्या वर्षी जूनमध्ये ती एका सिनेमाच्या शुटिंगवेळी कुमार हेगडेला भेटली होती. तिच्या तक्रारीनुसार कुमार हेगडेने तिला लग्नासाठी विचारणा केली होती. यानंतर तिला त्याच्यासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सांगितले. तो तिच्याशी लग्न करणार असल्याने ती यास तयार झाली. एकत्र राहत असताना तिने हेगडेला शरिरसंबंध ठेवण्यास नकार दिला, परंतू त्याने तिला ते करण्यास बळी पाडले. तसेच त्याने काही दिवसांपूर्वी आईची तब्येत खराब असल्याचे सांगून तिच्याकडून 50000 रुपये घेतले आणि तेव्हापासून तो तिच्या संपर्कात नव्हता.
यापूर्वी, कंगना रानौतचा आधीचा हेअर स्टाइलिस्ट ब्रेंडन एलीस्टर डी जीवर 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.