कंगनाला कोर्टाने दिला दणका; जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी जामीनपात्र वॉरंट जारी
By पूनम अपराज | Published: March 1, 2021 02:46 PM2021-03-01T14:46:36+5:302021-03-01T14:47:17+5:30
Andheri Court Issued Bailable Warrant to Kangana ranaut : समन्स बजावूनही ती हजर राहू शकली नाही, त्यानंतर अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने हे पुढचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई - ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरोधात अंधेरी कोर्टाने यांनी जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. समन्स बजावूनही ती हजर राहू शकली नाही, त्यानंतर अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने हे पुढचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अंधेरी कोर्टाने कंगना रनौत हिच्याविरूद्ध वॉरंट जारी केल्यानंतर कोर्टात हजर असलेल्या कंगनाच्या वकिलाने वरच्या कोर्टात या वॉरंटला आव्हान देणार असल्याचं सांगितलं असून पुढील सुनावणी २६ मार्चला आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या फौजदारी मानहानी दाव्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला नोटीस बजावली होती. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना घेतलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांची बदनामी केल्याचे दाव्यात म्हटले आहे. दंडाधिकारी आर. आर. खान यांनी या प्रकरणी जुहू पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी त्यानुसार सोमवारी न्यायालयात अहवाल सादर केला. कंगनावर केलेल्या आरोपांत तथ्य असल्याने आणखी तपास करावा लागेल, असे पोलिसांनी अहवालात म्हटल्याचे जावेद यांचे वकील कुमार भारद्वाज यांनी न्यायालयाला सांगितले होते.
कंगनाने काय म्हटले ?
अख्तर यांनी केलेल्या दाव्यानुसार, कंगनाने अर्णव यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर हे बॉलिवूडमधील ‘सुसाईड गॅंग’मध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असे म्हटले आहे. तिच्या या आरोपांमुळे जावेद यांची प्रतिमा मलिन झाली असा आराेप त्यांनी केला आहे. यू-ट्यूबवर ही क्लिप खूप पसरली, असा युक्तिवाद भारद्वाज यांनी केला होता.
समन्स बजावूनही उत्तर नाही
कंगनाची चौकशी करण्यासाठी पोलीस तिला वारंवार समन्स बजावत होते. परंतु, ती त्याला उत्तर देत नाही, अशी माहिती भारद्वाज यांनी दंडाधिकाऱ्यांना दिली होती. त्यांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने कंगनाला नोटीस बजावली होती. १ मार्चपर्यंत न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयाने कंगनाला देण्यात आले होते.
Kangana Ranaut's lawyer, who was present at the court, tells it that they want to challenge the summons in a higher court. Next hearing on 26th March. https://t.co/RK1PEZprJA
— ANI (@ANI) March 1, 2021
Mumbai: Metropolitan Magistrate Court, Andheri issues a bailable warrant against actor Kangana Ranaut in a defamation case filed against her by lyricist Javed Akhtar. Court issues the warrant after she failed to appear before it despite being summoned. pic.twitter.com/YAGBa8dvJK
— ANI (@ANI) March 1, 2021
मुंबई: गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरोधात अंधेरी कोर्टाने यांनी जामीनपात्र वॉरंट जारी केले pic.twitter.com/5oXLILu36M
— Lokmat (@MiLOKMAT) March 1, 2021