यूपीच्या बांदामध्ये दिल्‍लीसारखी घटना, ट्रकने महिलेला चिरडून 3Km फरफटत नेलं; जागीच मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 03:24 PM2023-01-05T15:24:55+5:302023-01-05T15:25:16+5:30

स्कूटीस्वार महिला स्कूटीसह ट्रकच्या चाकात अडकली आणि ओढली गेली, यावेळी अचानक ट्रकालाही आग लागली.

kanjhawala like death in UP banda, woman dies after being hit and dragged by truck | यूपीच्या बांदामध्ये दिल्‍लीसारखी घटना, ट्रकने महिलेला चिरडून 3Km फरफटत नेलं; जागीच मृत्यू...

यूपीच्या बांदामध्ये दिल्‍लीसारखी घटना, ट्रकने महिलेला चिरडून 3Km फरफटत नेलं; जागीच मृत्यू...

Next


बांदा : दिल्लीच्या कंझावालासारखी भीषण घटना यूपीतील बांदामध्येही घडल्याचे समोर आले आहे. एका स्कूटीवर बसलेल्या महिलेला गिट्टीने भरलेल्या भरधाव ट्रकने धडक दिली आणि ट्रकच्या चाकात अडकलेली महिला ट्रकसह 3 किलोमीटर ओढली गेली.  या धक्कादायक घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

महिला स्कूटीसह ट्रकच्या चाकात अडकल्याने ट्रकलाही आग लागली आणि काही वेळातच ट्रकने पेट घेतला. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने ट्रकची आग विझविण्यात आली. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला, पण त्याला काही तासांनंतर ताब्यात घेतले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मृत महिला ही लखनौची रहिवासी असून ती बांदा कृषी विद्यापीठात लिपिक म्हणून कार्यरत होती.

बांदा शहर कोतवाली परिसरातील मवई बायपासवर सायंकाळी साडेसात वाजता हा वेदनादायक अपघात घडला. लखनऊ येथील रहिवासी असलेली महिला चौधरी चरणसिंग कृषी विद्यापीठात लिपिक म्हणून कार्यरत होती. ही महिला स्कूटीवरुन भाजीपाला आणण्यासाठी जात होती, यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका डंपरने ओव्हरटेक करताना स्कूटीला चिरडले. या अपघातात स्कूटी स्वार स्कूटीसह ट्रकच्या चाकात अडकली, ट्रकचालकाने ट्रक तशीच 3.5 किमी पळवली. काही वेळानंतर ट्रकने पेट घेतला, यानंतर ट्रक चाकल फरार झाला.
 

Web Title: kanjhawala like death in UP banda, woman dies after being hit and dragged by truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.