अभिनेत्री रान्या रावनं चौकशीत सगळंच सांगितलं, सोन्याच्या तस्करीसंदर्भात केले धक्कादायक खुलासे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 13:28 IST2025-03-07T13:28:10+5:302025-03-07T13:28:58+5:30
सोन्याच्या तस्करीसाठी ती जॅकेट आणि कमरेचा पट्टा वापरायची. प्रत्येक प्रवासादरम्यान तिने तेच जॅकेट आणि पट्टा वापरला होता...

अभिनेत्री रान्या रावनं चौकशीत सगळंच सांगितलं, सोन्याच्या तस्करीसंदर्भात केले धक्कादायक खुलासे!
कन्नड अभिनेत्री रान्या रावने गोल्ड स्मगलिंगच्या आरोपांसंदर्भात पोलिसांसमोर मोठे खुलासे केले आहेत. आपण दुबई येथून १७ गोल्ड बार्स खरेदी केल्याचे रान्याने आपल्या जबाबात म्हटेल आहे. याशिवाय तिने तिच्या परदेश दौऱ्यासंदर्भातही माहिती दिली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, रान्या रावने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, "तिने युरोप, अमेरिका आणि दुबई, सौदी अरेबियाचे जौरे केले आहेत." यापूर्वी, रान्याने जवळपास ३० वेळा दुबई दौरा केल्याचे समोर आले होते. यामुळे ती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) चौकशीतच्या कक्षेत आली.
काय करतात रान्याचे वडील? -
अभिनेत्री रान्याने तिच्या कुटुंबासंदर्भातही माहिती दिली. रान्याने म्हटले आहे की, तिचे वडील केएस हेगदेश एक रियल इस्टेट व्यापारी आहेत आणि तिचा पती जतिन हुक्केरी एक आर्किटेक्ट आहे. जो बेंगळुरूमध्ये तिच्या सोबत राहतो. रान्या रावचे सावत्र वडील रामचंद्र राव कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे डीजीपी आहेत.
15 दिवसांत चौथा दुबई दौरा -
अभिनेत्रीला सोमवारी रात्रीच्या सुमारास बेंगळुरूतील केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टवरून 14 किलो सोन्यासह अटक करण्यात आली आहे. या सोन्याची किंमत जवळपास 14.5 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. खरे तर, १५ दिवसांत हा तिचा चौथा दुबई दौरा होता. यामुळे अधिकाऱ्यांना तिची शंका आली. रान्याला अटकक केल्यानंतर तिच्या घरावरही छापा टाकण्यात आला. यात तिच्या घरातून जवळपास 2 कोटी रुपयांची ज्वेलरी आणि 2.67 कोटी रुपयांची कॅश जप्त करण्यात आली.
प्रत्येक प्रवासादरम्यान तिने तेच जॅकेट आणि पट्टा वापरला -
तपासादरम्यान, गेल्या वर्षभरात रान्याने ३० वेळा दुबई दौरा केल्याचे म्हटले जात आहे. प्रत्येकवेळी दुबईला गेल्यानंतर रान्याने काही किलो सोने लपवून आणले होते. प्रत्येक किलोसाठी तिला १ लाख मिळायचे, अशी माहिती समोर आली आहे. प्रत्येक ट्रिपमधून रान्या १२ ते १३ लाख रुपये कमावयची. सोन्याच्या तस्करीसाठी ती जॅकेट आणि कमरेचा पट्टा वापरायची. प्रत्येक प्रवासादरम्यान तिने तेच जॅकेट आणि पट्टा वापरला होता.