लग्न झालं, मधुचंद्राच्या रात्री पत्नीचा फोन वाजला, ती रात्रचं शेवटची ठरली; धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 07:30 PM2023-03-14T19:30:39+5:302023-03-14T19:38:09+5:30
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाच्या लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी हत्या झाल्याचे समोर आले आहे. या तरुणाची मधुचंद्राची रात्र ही शेवटची रात्र ठरली आहे. तरुणाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर नातेवाईकांनी गुन्हा दाखल केला. मात्र, ९ महिन्यांपासून मृताची आई हत्येतील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांच्या फेऱ्या मारत आहे. मृताच्या आईचा आरोप आहे की, हनिमूनच्या वेळी वधूच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आणि मेसेज आला होता. त्यानंतर मुलगा बाहेर गेला आणि २० किलोमीटर अंतरावर त्याची हत्या करण्यात आली. (Crime News)
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला, मात्र ९ महिने उलटूनही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या हत्येतील आरोपींना अटक करण्याची मागणी मृताच्या आईने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. मुलाच्या हत्येत पत्नीचाही हात असल्याचा आरोप आईने केला आहे.
"साहेब, मी माझ्या पत्नीची हत्या केली", पत्नीच्या हत्येनंतर आरोपीने गाठले पोलीस ठाणे
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमधील घाटमपूर येथील रहिवासी असलेल्या सर्वेश या तरुणाचे १७ मे २०२२ रोजी लग्न झाले होते. त्यानंतर १९ मे रोजी सर्वेशचा मृतदेह घरापासून २० किलोमीटर अंतरावर रेल्वे लाईनच्या बाजूला अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, आजपर्यंत या हत्येतील आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
या प्रकरणाबाबत सर्वेशची आई लीलावती मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी पोहोचल्या. लीलावती म्हणाल्या की, मधुचंद्राच्या रात्री वधूच्या फोनवर कोणीतरी फोन आला, त्यानंतर मेसेजही आला. यानंतर मुलगा खोलीतून निघून गेला. यानंतर घरापासून २० किलोमीटर अंतरावर बडी पाल येथील रेल्वे लाईनजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. ज्या क्रमांकावरून वधूला फोन आला होता, त्या क्रमांकावर फोन केला, पण तो फोन बंद होता. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र आजपर्यंत मारेकरी सापडलेले नाहीत.
या हत्येत नववधूचा हात असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. तिच्या मोबाईलवर कॉल आल्यानंतर मुलगा घरातून निघून गेला होता. मात्र, पोलिसांनी अद्याप चौकशी केली नाही, मोबाईल क्रमांकाच्या आधारे कोणालाही अटक करण्याचा प्रयत्न केला नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.