'पती नाही तर कधी मन...; मदतीच्या नावावर कॉन्स्टेबलने महिलेसोबत केलं अश्लील चॅटींग, एसपींनी केलं निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 07:00 PM2023-04-13T19:00:19+5:302023-04-13T19:00:44+5:30

पोलीस आपले रक्षक असतात. पण, कधी कधी काही पोलीस स्वार्थीसाठी काहीही करु शकतात.

kanpur dehat constable spoke obscenely to the woman in the name of help suspended | 'पती नाही तर कधी मन...; मदतीच्या नावावर कॉन्स्टेबलने महिलेसोबत केलं अश्लील चॅटींग, एसपींनी केलं निलंबित

'पती नाही तर कधी मन...; मदतीच्या नावावर कॉन्स्टेबलने महिलेसोबत केलं अश्लील चॅटींग, एसपींनी केलं निलंबित

googlenewsNext

पोलीस आपले रक्षक असतात. पण, कधी कधी काही पोलीस स्वार्थीसाठी काहीही करु शकतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे. एक मुलगी मदतीच्या आशेने पोलिसांकडे जाते, पण जेव्हा रक्षक पीडितेच्या असहायतेचा फायदा घेऊ लागतात. ही घटना कानपूर देहात येथील भोगनीपूर कोतवाली भागातील आहे. येथे तैनात असलेल्या एका हवालदाराने महिलेला मदत करण्याचे आश्वासन देत तिच्याशी अश्लील चॅटींग केल्याचे फोटो वाहयरल झाले आहेत.  चॅट व्हायरल झाल्यानंतर संतापलेल्या एसपींनी कॉन्स्टेबलला निलंबित केले आहे. जालौनच्या ओराई शहरात राहणाऱ्या एका महिलेचा भोगनीपूरमध्ये कामगार म्हणून काम करणाऱ्या तरुणाशी वाद झाला.

पीडित महिलेचे दिलेली तक्रार अशी, मी तक्रार देण्यासाठी भोगनीपूर पोलीस ठाण्यात गेले होते. तेथे महिलेची भेट कॉन्स्टेबल लायक सिंग यांच्याशी झाली. त्यांनी महिलेचा नंबर घेतला. यानंतर त्यांनी मोबाईलवर व्हॉट्सअॅपवर चॅट करून मदतीचे आश्वासन दिले. तुला नवरा नाही त्यामुळे मी मदत करेन असे त्याने चॅटींगमध्या सांगितले. एका अर्ज करुन देण्यासाठी महिलेला त्याने मेसेज केला. महिलेने अर्ज लिहिता येत नसल्याचे सांगितल्यावर हवालदाराने मी तो टाईप करून जमा करीन, असे सांगितले. 

महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने या कॉन्स्टेबलचा काय हेतू काय होता हे समोर आलेले नाही. व्हायरल चॅटच्या स्क्रीनशॉटनुसार, कॉन्स्टेबलने महिलेला विचारले,अश्लील चॅटींग केले. यावर महिलेने आक्षेप घेतला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणाचा तपास सुरू केला.

'सगळं माझ्यामुळे झालं...' मुलाच्या एनकाउंटरनंतर अतिक अहमदने पोलिसांकडे केली 'ही' विनंती

कॉन्स्टेबलचे हे चॅटींग सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. हे प्रकरण एसपी बीबीजीटीएस मूर्ती यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा ते संतापले. त्यांनी तात्काळ कॉन्स्टेबल लायकसिंग यांना निलंबित केले. यासोबतच संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर तपास सीओ भोगनीपूर तनु उपाध्याय यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. 

Web Title: kanpur dehat constable spoke obscenely to the woman in the name of help suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.