धक्कादायक! हॉस्टेलमध्ये मुलींच्या आंघोळीचा व्हिडिओ बनवत होता सफाई कर्मचारी, असा झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 06:47 PM2022-09-29T18:47:04+5:302022-09-29T18:47:48+5:30
Crime News : मुलींचे म्हणणे आहे की, कर्मचारी मुलींना आंघोळी करतानाचे व्हिडिओ बनवतात. एका मुलीने आंघोळ करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याला पकडले. यानंतर हॉस्टेलमध्ये एकच खळबळ उडाली.
कानपूर : मोहाली एमएमएस कांडनंतर आता उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये असाच प्रकार समोर आला आहे. याठिकाणी मुलींनी हॉस्टेल कर्मचाऱ्यांवर अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप केला आहे. मुलींचे म्हणणे आहे की, कर्मचारी मुलींना आंघोळी करतानाचे व्हिडिओ बनवतात. एका मुलीने आंघोळ करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याला पकडले. यानंतर हॉस्टेलमध्ये एकच खळबळ उडाली.
रावतपूर पोलीस स्टेशन हद्दीतील काकादेव येथील तुळशीनगरमध्ये असलेल्या गर्ल्स हॉस्टेलच्या मुलींनी हॉस्टेलमध्ये एका कर्मचाऱ्यावर अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप केला आहे. पोलीस तक्रारीनुसार, आरोपीने हॉस्टेलमधील मुलींचे अनेक अश्लील व्हिडिओ बनवले. आरोपी हॉस्टेलमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करतो.
सफाई कर्मचाऱ्याला आंघोळी करताना गुपचूप व्हिडिओ बनवत असताना एका मुलीने पाहिले. त्यानंतर अनेक मुली एकत्र जमल्या आणि त्यांनी त्याच्याकडून फोन हिसकावून घेतला व पाहिले की, फोनमध्ये असे अनेक व्हिडिओ आहेत का? तोपर्यंत आरोपीने फोनमधून अनेक व्हिडिओ डिलीट केले होते. यानंतर मुलींनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली.
विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्यात अतिरिक्त एसपी म्हणून तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या मालकीचे हे गर्ल्स हॉस्टेल आहे. या हॉस्टेलमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील अनेक मुली राहत असून मेडिकल परीक्षेची तयारी करत आहेत. दरम्यान, याप्रकरणी एसीपी कल्याणपूर दिनेश शुक्ला यांनी इंडिया टुडेला सांगितले की, मुलींकडून तक्रार आली असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आम्ही आरोपीला अटक केली आहे. चौकशी सुरू आहे. आम्ही आरोपीचा फोन देखील तपासत आहोत, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मोहालीतील चंडीगड विद्यापीठातील एमएमएस कांड
गेल्या काही दिवसांपूर्वी पंजाबच्या मोहालीतील चंडीगड विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये मुलींचे आंघोळी करतानाचे व्हिडीओ बनवून व्हायरल केल्याचे प्रकरण समोर आले होते. यानंतर विद्यापीठ परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मुलींचे स्नान करतानाचे व्हिडीओ बनवून व्हायरल केल्याप्रकरणी एका विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली होती. ती एमबीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिने हे व्हिडीओ तिच्या शिमला येथील मित्राला पाठवले होते. त्याने सोशल मीडियावरव्हायरल केले होते. दरम्यान, याबाबत राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.