धक्कादायक! रक्षाबंधनाला बहिण आली होती माहेरी; मेहुण्याकडून भावोजींची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 04:14 PM2021-08-23T16:14:31+5:302021-08-23T16:15:41+5:30

सासऱ्यांनीच पोलिसांना दिली हत्येची माहिती; आरोपी मेहुण्याला अटक

kanpur man killed brother in law on rakshabandhan after husband wife dispute | धक्कादायक! रक्षाबंधनाला बहिण आली होती माहेरी; मेहुण्याकडून भावोजींची निर्घृण हत्या

धक्कादायक! रक्षाबंधनाला बहिण आली होती माहेरी; मेहुण्याकडून भावोजींची निर्घृण हत्या

Next

कानपूर: देशभरात काल रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. संपूर्ण देशात रक्षाबंधन आनंदात साजरं झालं. मात्र कानपूरमध्ये कालच एक धक्कादायक घटना घडली. बहिणीला त्रास देणाऱ्या भावोजींची हत्या भावानं निर्घृण हत्या केली. रक्षाबंधनाच्या सणासाठी घरी आलेल्या बहिणीनं पतीकडून दिला जाणारा त्रास भावाला सांगितला. त्यानंतर संतापलेल्या भावानं भावोजीची हत्या केली. 

रक्षाबंधन साजरं करण्यासाठी महिली पतीला घेऊन भावाच्या घरी आली होती. मद्यधुंद अवस्थेत असलेला पती मेहुण्याला शिवीगाळ करू लागला. त्यामुळे मेहुण्याला राग अनावर झाला. त्यानं धारदार सुरीनं भावोजीचा खून केला. त्याच्या वडिलांनी स्वत: पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

बीएसएनएलमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यानं १४ वर्षांपूर्वी त्याच्या मुलीचा विवाह जवळच राहणाऱ्या एका तरुणाशी करून दिला. त्यांना २ मुलं आहेत. पती दारू पित असल्यानं अनेकदा घरात वाद व्हायचे. रविवारी रात्री पती त्याच्या पत्नीला घेऊन रक्षबंधनासाठी गेला होता. थोड्या वेळानं तो स्वत:च्या घरी परतला. काही वेळानंतर तो पुन्हा सासरी आला. दारुच्या नशेत त्यानं सासरच्या माणसांशी वाद घातला. त्यांनी सासरच्यांना शिवीगाळ केली.

भावोजी आणि २० वर्षीय मेहुण्याचा वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर मेहुण्यानं भावोजीची चाकूनं हत्या केली. मृताच्या सासऱ्यांनी झाला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मेहुण्याला अटक केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Web Title: kanpur man killed brother in law on rakshabandhan after husband wife dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.