विहिरीत डोकावून माकड पुन्हा पुन्हा करत होते इशारा, लोकांनी जाऊन पाहिलं तर बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 12:00 PM2021-09-10T12:00:45+5:302021-09-10T12:03:42+5:30
हीरामन पुरवामध्ये एका कोरड्या विहिरीत महिलेचा मृतदेह पडला होता. महिला त्याच परिसरात राहत होती, ती सकाळी शौचास बाहेर गेली होती. तेव्हापासून बेपत्ता होती.
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये माकडांनी विहिरीत पडलेला एक मृतदेह शोधून काढला. माकडांनी परिसरातील लोकांना इशारा करून करून विहिरीत पडलेल्या मृतदेहाची माहिती दिली. हीरामन पुरवामध्ये एका कोरड्या विहिरीत महिलेचा मृतदेह पडला होता. महिला त्याच परिसरात राहत होती, ती सकाळी शौचास बाहेर गेली होती. तेव्हापासून बेपत्ता होती.
परिसरातील गोपाल सिंह चौहान यांनी सांगितलं की, पुन्हा पुन्हा दोन ते तीन माकड येत होते आणि विहीरीवर बसून आत जात होते आणि मग लोकांकडे बघत होते. हे एकदा नाही तर अनेकदा त्यांनी केलं. तेव्हा गोपाल सिंह चौहान इतर लोकांना घेऊन विहिरीवर गेले. त्यांना वाटलं की, कदाचित माकडाचं पिल्लू पडलं असेल ज्यामुळे ते असं करत असतील. (हे पण वाचा : तीनवेळा लग्न केलं, तिसऱ्यांदा संसार मोडला; माहेरी आली अन् खुर्चीवर बसलेल्या वडीलांची हत्या केली)
गोपाल सिंह चौहान म्हणाले की, जेव्हा आम्ही विहिरीत पाहिलं तर आम्हाला धक्का बसला. आम्हाला दिसलं की, परिसरातच राहणारी महिला राधा देवी कश्यपचा मृतदेह विहिरीत पडला आहे. मृतदेह दिसल्यावर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. ज्यानंतर रेस्क्यू टीमला बोलवण्यात आलं आणि त्यांनी ६ तासांच्या प्रयत्नांनंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढला.
याप्रकरणी एसीपीसी सीसामऊ म्हणाले की, महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मोठ्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. महिला तिच्या मुलीच्या शाळेच्या अॅडमिशनमुळे चिंतेत होती. असा अंदाज आहे की, तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असेल. सध्या पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.