ब्लेडने विद्यार्थिनीच्या छातीवर लिहिलं आलं नाव, व्हिडीओ बनवला; मग धमकावून 10 लाख लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 09:34 IST2023-03-18T09:34:24+5:302023-03-18T09:34:39+5:30
Crime News : आरोपीच्या धमकीमुळे ती इतकी घाबरली की, तिने घरातील 10 लाख रूपये त्याला नेऊन दिले. हे पैसे तिच्या वडिलांनी मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी ठेवले होते.

ब्लेडने विद्यार्थिनीच्या छातीवर लिहिलं आलं नाव, व्हिडीओ बनवला; मग धमकावून 10 लाख लुटले
Crime News : यूपीमधील ग्वालटोली भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे आठव्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला शेजारी राहणाऱ्या तरूणाने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि मग तिच्यावर रेप केला.
इतकंच नाही तर त्याने ब्लेडने मुलीच्या छातीवर आपलं नाव लिहून तिला धमकीही दिली. आरोपी तिला म्हणाला की, तिने तिच्या घरातील पैसे आणून द्यावे. असं केलं नाही तर तो ब्लेडने तिचा गळाही कापेल. सोबतच रेपचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल.
आरोपीच्या धमकीमुळे ती इतकी घाबरली की, तिने घरातील 10 लाख रूपये त्याला नेऊन दिले. हे पैसे तिच्या वडिलांनी मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी ठेवले होते. जेव्हा त्यांना घरात पैसे दिसले नाही तेव्हा त्यांना धक्का बसला. वडिलांनी चौकशी केली तर मुलीने सगळं काही सांगितलं.
त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. तिने सांगितलं की, अमन नावाच्या तरूणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तिच्यासोबत अत्याचार केला. नंतर ब्लॅकमेल करून आईचं मंगळसूत्रही मागितलं होतं. तिने ते त्याला नेऊन दिलं होतं. पण मग तो आणखी पैशांची डिमांड करत होता. घाबरून तिने त्याला घरातील साडे दहा लाख रूपये नेऊन दिले. यात अमनला त्याच्या मित्राचीही साथ आहे.
पोलिसांनी अमन आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण सध्या अमन फरार आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी एक टीम तयार केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, त्यांना लवकरच पकडलं जाईल.