संतापजनक! अनैतिक संबंधात अडसर, हल्ल्यात पती बचावला, रोज विष देत राहिली; असा झाला हत्येचा उलघडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 12:56 PM2022-12-10T12:56:09+5:302022-12-10T13:05:50+5:30

प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या पतीस बाजूला करण्यासाठी पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

kanpur wife kills husband after giving him slow poison in kanpur over illicit relationship | संतापजनक! अनैतिक संबंधात अडसर, हल्ल्यात पती बचावला, रोज विष देत राहिली; असा झाला हत्येचा उलघडा

संतापजनक! अनैतिक संबंधात अडसर, हल्ल्यात पती बचावला, रोज विष देत राहिली; असा झाला हत्येचा उलघडा

Next

प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या पतीस बाजूला करण्यासाठी पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने प्रियकरासोबत षडयंत्र रचत पतीची हत्या केली, कानपूरमध्ये एका पत्नीने आपल्या पतीला मार्गातून दूर करण्यासाठी पहिल्यांदा पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. यात पती बचावला. मात्र यानंतर पत्नीने औषधांच्या नावाखाली पतीला विष देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पतीचे यकृत आणि किडनी निकामी होऊन मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सपनाचा प्रियकर आणि इतर दोन जणांना अटक करून तुरुंगात रवानगी केली.

Traffic Police | मिसरूड फुटण्याआधीच वाहन चालवाल, तर पाच हजारांचा दंड

कल्याणपूर पोलीस ठाणे परिसरात राहणारा ऋषभ त्रिपाठी यांची पत्नी सपना हिचे राज कपूर गुप्तासोबत प्रेमसंबंध होते. हा प्रकार ऋषभला कळताच त्याने पत्नीला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रेमात अडथळे येत असल्याचे पाहून सपनाने तिचा प्रियकर राज कपूरसोबत पती ऋषभला मारण्यासाठी प्लॅन केला. 27 नोव्हेंबर रोजी ऋषभ त्याच्या मित्रासोबत लग्न समारंभासाठी चाकरपूर गावात गेला होता. परतत असताना अज्ञातांनी ऋषभवर जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या ऋषभला रुग्णालयात दाखल करण्यात आले, रुग्णालयात प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रुग्णालयातून घरी आणण्यात आले. मात्र प्रेमात आंधळा झालेल्या सपनाने पुन्हा एकदा प्लॅनिंग सुरू केले आणि औषधांच्या नावाखाली ऋषभला केमिकल आणि चुकीची औषधे द्यायला सुरुवात केली, त्यामुळे ऋषभचे यकृत खराब झाले आणि 3 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.

असा झाला उलघडा 

या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला आहे. 27 नोव्हेंबर रोजी सचेंडी पोलीस स्टेशन हद्दीत ऋषभ त्रिपाठी मीठ या तरुणावर हल्ला झाला होता. ज्यात तो गंभीर जखमी झाला. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र घरीच पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावली आणि रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी शेजारी राम कृष्ण विश्वकर्मा यांचे नाव घेऊन तक्रार दिली होती, ज्यांच्याशी त्यांचा जुना वाद होता. त्यावरून सचेंडी पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

ज्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली होती, त्याचा यात कोणताही सहभाग नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपासात एक गोष्ट समोर आली की, मृताची पत्नी आणि तिचा एक मित्र राज कपूर गुप्ता यांच्यात जवळचे संबंध होते आणि दोघांनी मिळून हत्येचा कट रचला होता. पत्नीने तिच्या एका मित्रासह 27 नोव्हेंबर रोजी ऋषभवर जीवघेणा हल्ला केला. मात्र उपचारानंतर तो वाचला. घरी आल्यावर पत्नी सपनाने प्रियकरासोबत कट रचला. यात पत्नीने चपुकीचे औषधे देत पतीचे यकृत निकामी केले, यात पतीचा मृत्यू झाला. पोलिसांनी सपना, राज कपूर आणि सत्येंद्र विश्वकर्मा आणि सुरेंद्र यादव यांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे.

Web Title: kanpur wife kills husband after giving him slow poison in kanpur over illicit relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.