भयंकर! डोक्यावर कर्जाचं ओझं असल्याने कुटुंबाने घेतला टोकाचा निर्णय; सामूहिक आत्महत्या करून संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 09:03 PM2021-06-28T21:03:27+5:302021-06-28T21:05:19+5:30
Crime News : कर्ज फेडण्याच्या काळजीतून त्यांनी टोकाचा निर्णय घेत जीवन संपवलं आहे.
नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये मन हेलावून टाकणारी एक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कर्ज फेडण्याच्या काळजीतून त्यांनी टोकाचा निर्णय घेत जीवन संपवलं आहे. कर्नाटकमधील यादगीरमध्ये सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा जणांनी तलावात उडी मारल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तींमध्ये आई-वडील, तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.
डोक्यावर कर्जाचं ओझं असल्याने कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. त्यातच शेतात पिक घेण्यास अपयश आल्याने कर्ज कसं फेडणार?, असा प्रश्न त्यांना पडला होता. अखेर तलावात घेऊन कुटुंबाने आपलं जीवन कायमचं संपवलं. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तलावातून सहा जणांचे मृतदेह बाहेर काढले. तसेच शवविच्छेदनासाठी मृतदेह हे रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
Police recover bodies of six members of a family - father mother, three daughters, and a son, who died allegedly by jumping into the pond in Yadgir. pic.twitter.com/lTsg1j5Ayh
— ANI (@ANI) June 28, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, भीमार्य सुरपुरा, त्यांची पत्नी शांतम्मा, मुलगा शिवराज आणि मुली सुमित्रा, श्रीदेवी, लक्ष्मी अशी आत्महत्या केलेल्यांची नावं आहेत. ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. आत्महत्या केलेल्यांपैकी काही जणांचे मृतदेह तलावात वर तरंगताना गावकऱ्यांनी पाहिल्यानंतर या भयंकर घटनेची माहिती मिळाली, असं पोलिसांनी म्हटलं आहे. आत्महत्येमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अशा प्रकरच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
धक्कादायक! आई व मुलीसह 3 जणांना गमवावा लागला जीव; आरोग्य विभागाचा कर्मचारी असल्याचं खोटं सांगून दिलं विष#coronavirus#Crime#crimesnews#Police#deathhttps://t.co/oQtI5jk4Xp
— Lokmat (@MiLOKMAT) June 28, 2021
माणुसकीला काळीमा! कोरोनाचं औषध म्हणून दिलं 'विष', तिघांचा मृत्यू; पैशांसाठी असा रचला भयंकर कट
तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. कोरोना औषधाच्या नावाखाली विषाच्या गोळ्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. कर्ज घेतलेल्या पैशांमुळे ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. विषबाधा झालेल्या कुटुंबाने एका व्यक्तीला कर्ज दिले होते. जेव्हा कुटुंबाने पैशाची मागणी केली. तेव्हा त्याने हे कृत्य केलं आहे. तामिळनाडूच्या इरोडमध्ये ही घटना घडली आहे. करुप्पनकाउंडर (72 वर्षे) यांनी काही महिन्यांपूर्वी आर कल्याणसुंदरम नावाच्या व्यक्तीला 15 लाख रुपये दिले होते. करुप्पनकाउंडर यांनी गरज असल्यामुळे कल्याणसुंदरमकडे पैसे परत मागितले. पैशांची परतफेड करू न शकल्यामुळे कल्याणसुंदरम यांनी करुप्पनकाउंडर आणि त्याच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचला.
एक हजाराहून अधिक लोकांच्या बँक खात्यातून आरोपींनी काढून घेतले कोट्यवधी रुपये #BJP#SakshiMaharaj#crime#Police#Bankhttps://t.co/AXjkSxWImt
— Lokmat (@MiLOKMAT) June 28, 2021
धक्कादायक! आईच्या मृतदेहासमोर दोन्ही भाऊ आपल्या पत्नींसह एकमेकांशी भांडण करू लागले अन्...#Crime#Policehttps://t.co/PyzQJjQdSC
— Lokmat (@MiLOKMAT) June 27, 2021