BS Yediyurappa's Granddaughter Dead: येडीयुराप्पा यांच्या नातीची गळफास घेऊन आत्महत्या; तीन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 02:51 PM2022-01-28T14:51:02+5:302022-01-28T14:58:10+5:30

BS Yediyurappa's Granddaughter Dead: सौंदर्या नीरज ही रामय्या हॉस्पटलमधे डॉक्टर होती. तिचे डॉ. नीरज याच्याशी २०१९ मध्ये लग्न झाले होते.

Karnataka Bjp leader BS Yediyurappa's granddaughter Soundarya Neeraj found dead in Bengaluru | BS Yediyurappa's Granddaughter Dead: येडीयुराप्पा यांच्या नातीची गळफास घेऊन आत्महत्या; तीन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न

BS Yediyurappa's Granddaughter Dead: येडीयुराप्पा यांच्या नातीची गळफास घेऊन आत्महत्या; तीन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न

Next

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडीयुराप्पा यांची नात शुक्रवारी बंगळुरूच्या वसंतनगर येथील फ्लॅटमध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

सौंदर्या नीरज ही रामय्या हॉस्पटलमधे डॉक्टर होती. तिचे डॉ. नीरज याच्याशी २०१९ मध्ये लग्न झाले होते. आज सकाळी १० च्या सुमारास ही घटना उघड झाली. मोलकरणीने बराच वेळ दरवाजा ठोठावला परंतू आतून दरवाजा उघडला गेला नाही. म्हणून तिने डॉ. नीरजना फोन करून माहिती दिली. नीरजनी घरी पोहोचून दरवाजा उघडला तेव्हा सौंदर्या हिचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. 

पोलिसांनुसार सौंदर्या यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता आहे. प्रथमदर्शनी सौदर्या यांनी आत्महत्या केल्याचे दिसत असल्याचे पोलीस म्हणाले. 

Web Title: Karnataka Bjp leader BS Yediyurappa's granddaughter Soundarya Neeraj found dead in Bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.