मुलीने जेवणातून विष देऊन परिवारातील चौघांचा घेतला जीव, कारण समजल्यावर पोलिसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 03:02 PM2021-10-19T15:02:58+5:302021-10-19T15:03:21+5:30
पोलिसांनुसार, दावनगरे जिल्ह्यात राहणारी १७ वर्षीय मुलीला बालपणीच तिने आजी-आजोबा आपल्या घरी घेऊन गेले होते.
कर्नाटकच्या दावनगरेमध्ये एका १७ वर्षीय मुलीने परिवारात कथित भेदभाव असल्याने जेवणात विष टाकून परिवाराला खाऊ घातलं. ज्यात परिवारातील ४ लोकांचां मृत्यू झाला. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, समोर आल्यावर आता या घटनेचा खुलासा झाला. जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा पोलिसही हैराण झाले.
पोलिसांनुसार, दावनगरे जिल्ह्यात राहणारी १७ वर्षीय मुलीला बालपणीच तिने आजी-आजोबा आपल्या घरी घेऊन गेले होते. मोठी झाल्यावर ३ वर्षाआधी तिचे आई-वडील तिला घरी घेऊन आले. दोन्ही परिवार एकाच गावात ३ गल्ल्या सोडून राहतात.
चौकशी दरम्यान मुलीने सांगितलं की, तिचे आई-वडील तिच्या दुसऱ्या भाऊ-बहिणीचा जास्त लाड करत होते. तर तिला रागावलं जायचं आणि मारलं जायचं. वडिलांनी तिला ८व्या वर्गात प्रवेश मिळवून दिला होता. पण ती व्यवस्थित शिकू शकली नाही. यानंतर वडिलांनी तिला कामासाठी शेतात नेणं सुरू केलं. तेव्हाच मुलीने संपूर्ण परिवाराला संपवण्याचा निर्णय घेतला.
जेवणातून दिलं विष
पोलिसांनुसार मुलीने १२ जुलैच्या रात्री जेवण बनवून घरातील लोकांना दिलं. ते खाऊन तिची ८० वर्षीय दादी, ४५ वर्षीय वडील, ४० वर्षीय आई, १६ वर्षाची बहीण आणि लहान भावाची हालत खराब झाली होती. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. इथे उपचारादरम्यान तिच्या भावाला सोडून सर्वांचा मृत्यू झाला. आता फॉरेन्सिक रिपोर्टमधून समोर आलं की, त्या रात्रीच्या जेवणात विष टाकलं होतं.
यानंतर मुलीची पुन्हा चौकशी करण्यात आली. तेव्हा तिने तिचा गुन्हा कबूल केला. हत्येचं कारण जाणून घेतल्यावर पोलिसही हैराण झाले आहेत. पोलिसांनी आरोपी मुलीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र ती अल्पवयीन असल्याने तिची केस सुनावणीसाठी जुवेनाइल जस्टीस बोर्डमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.