डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटले 1.16 कोटी रुपये; महिलेसह 3 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 05:48 PM2022-05-27T17:48:07+5:302022-05-27T17:57:12+5:30

Doctors Trapped in Honey Trap : हनी ट्रॅप प्रकरणाचा तपास केला असता पीडित डॉक्टरचा मित्र नागराज हा यामधील मास्टरमाईंड असल्याचे आढळून आले.

karnataka doctor trapped in honey trap looted rs 1.16 crore 3 arrested including a woman | डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटले 1.16 कोटी रुपये; महिलेसह 3 जणांना अटक

डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटले 1.16 कोटी रुपये; महिलेसह 3 जणांना अटक

Next

कर्नाटकात हनी ट्रॅपचे प्रकरण समोर आले आहे. येथे एका डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये (Doctors Trapped in Honey Trap)अडकवून 1.16 कोटी वसूल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत याप्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. या प्रकरणी कलबुर्गी येथील अलंद शहरातील बाबूराव यांनी उप्परपेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या विशेष शाखेकडून करण्यात आला.

हनी ट्रॅप प्रकरणाचा तपास केला असता पीडित डॉक्टरचा मित्र नागराज हा यामधील मास्टरमाईंड असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुराव क्लिनिक चालवतात. त्यांच्या मुलाला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. नागराजने त्यांच्या मुलाला बंगळुरू येथील एका चांगल्या कॉलेजमध्ये जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि प्रवेशासाठी 66 लाख रुपयांची मागणी केली. तक्रारीनुसार, बाबूराव यांनी नागराजला हप्त्याद्वारे 66 लाख रुपये दिले होते, मात्र आरोपी नागराजला बाबूराव यांच्या मुलाला वैद्यकीय महाविद्यालयात जागा मिळवून देता आली नाही. त्यामुळे बाबूराव यांनी नागराजकडे पैसे परत मागितले. वारंवार विनंती करूनही नागराजने पैसे परत केले नाहीत.

एके दिवशी नागराजने बाबूराव यांना पैसे देण्यासाठी बंगळुरुला येण्यास सांगितले. नागराजने जानेवारी 2020 मध्ये बाबूरावांसाठी हॉटेल बुक केले आणि स्वतः त्याच हॉटेलमध्ये थांबला. यानंतर पीडित डॉक्टर बाबूराव यांनी आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, दुसऱ्या दिवशी पहाटे दोन महिला त्यांच्या खोलीत आल्या आणि त्यांच्या बेडवर बसल्या. महिला आल्यानंतर काही वेळातच आपण पोलीस आहोत. असे सांगत तीन पुरुष तेथे आले. त्यांनी महिलांसह बेकायदेशीर कामात सहभाग असल्याचा आरोप केला. तसेच, महिलांसोबत उभे राहून फोटो काढल्याचे बाबूराव यांनी सांगितले. 

याशिवाय सोन्याचे दागिने आणि 35 हजार रुपये घेतले. त्यानंतर नागराजने आपल्या डॉक्टर मित्राला मदत करण्याच्या बहाण्याने फोन केला. त्यांने बाबूराव यांच्यावर वेश्याव्यवसायाचा गुन्हा दाखल करण्यापासून रोखण्यासाठी बाबुरावकडे 70 लाख रुपयांची मागणी केली. डॉक्टरांनी सांगितले की, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, असे सांगताच त्याने 50 लाख रुपये देण्यास सांगितले. एवढे पैसे देऊनही नागराजने खोलीत सापडलेल्या दोन महिलांच्या जामीनासाठी बाबूराव यांच्याकडे आणखी 20 लाख रुपयांची मागणी केली. डॉक्टरने पैसे देण्यास नकार दिल्याने नागराजने चार अज्ञात लोकांना पाठवून धमकावण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, डॉक्टर बाबूराव यांनी न घाबरता धमकावणाऱ्या लोकांची चौकशी सुरू केली. त्यामुळे आपले सत्य बाहेर येऊ नये, या भीतीने ते तेथून पळून गेले. यानंतर बाबुराव यांनी पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली असून, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.

Web Title: karnataka doctor trapped in honey trap looted rs 1.16 crore 3 arrested including a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.