धक्कादायक! मुलीचे प्रेमसंबंध समजल्यानंतर वडिलांनी तरुणीची केली हत्या, प्रियकरानेही संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 05:34 PM2023-06-28T17:34:50+5:302023-06-28T17:35:34+5:30

प्रेयसीचा मृतदेह पाहून तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून जीव दिला.

karnataka news father smothers daughter over affair with lower caste neighbour boyfriend end life jumping before train | धक्कादायक! मुलीचे प्रेमसंबंध समजल्यानंतर वडिलांनी तरुणीची केली हत्या, प्रियकरानेही संपवले जीवन

धक्कादायक! मुलीचे प्रेमसंबंध समजल्यानंतर वडिलांनी तरुणीची केली हत्या, प्रियकरानेही संपवले जीवन

googlenewsNext

कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनी स्वत:च्या मुलीची हत्या केल्याचे समोर आले. अन्य जातीतील मुलावर मुलीचे प्रेम असल्याच्या कारणामुळे मुलीच्या वडिलांनी मुलीची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच प्रियकरानेही ट्रेन समोर उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. 

कार अन् बाईकचा भीषण अपघात, चिमुकल्यासह ३ जण ठार

या तरुणीचे वय २० वर्ष होते. ती  ग्रॅज्युएशन करत होती. आणि तिच्या प्रियकराचे नाव गंगाधर होते. तो वादक होता. २३ वर्षीय गंगाधर हा व्यवसायाने मजूर म्हणून काम करत होता. दोघेही एकमेकांना दोन वर्षांपासून ओळखत होते.

कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि तरुण अन्य जातीचे होते. ही घटना कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील बोदागुर्की गावात घडली. मुलीचे वडील कृष्णमूर्ती याला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री मृताच्या घरी मुलीच्या प्रेमप्रकरणावरून जोरदार भांडण झाले. मुलगी तरुणाशीच लग्न करणार यावर ठाम होती.  दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांना तरुणीच्या खुनाची माहिती मिळाली.

केजीएफच्या पोलीस अधीक्षक धरनदेवी मलागट्टी यांनी सांगितले की, 'मुलीला या मुलापासून दूर राहण्यास वडिलांनी सागितले होते, पण मुलीने यास नकार दिला. रागात वडिलांनी मंगळवारी सकाळी तिचा गळा दाबून खून केला. सकाळी ६.३० ते ७.३० च्या दरम्यान तरुणीची हत्या करण्यात आली.

Web Title: karnataka news father smothers daughter over affair with lower caste neighbour boyfriend end life jumping before train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.