१० वर्षाच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ नराधमांना अटक; आजीनं वेळीच आवाज ऐकला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 06:11 PM2021-06-21T18:11:44+5:302021-06-21T18:12:48+5:30
Crime News : तिच्या आजीच्या लक्षात आले की, १० वर्षांची मुलगी हरवली आहे. आजी तिला शोधू लागली आणि तिने शेतातून तिच्या किंकाळ्या ऐकल्या.
एका १० वर्षाच्या मुलीला शेतातील वाईट आत्मांना पळवण्यासाठी बळी देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली ग्रामीण बेंगळुरू येथे एका पुरोहितासह पाच जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनीकर्नाटकमधील अमानुष दुष्कर्म प्रतिबंध आणि अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा (Black magic) विधेयक, अपहरण आणि धमकी या अंतर्गत पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, ही घटना १४ जून रोजी नेलामंगलाजवळील गांधी गावात घडली जेव्हा ती अल्पवयीन मुलगी घरासमोर खेळत होती. इयत्ता चौथीची मुलगी ही मुलगी आपल्या आजीबरोबर राहत होती, तर तिचे आई-वडील मगदी येथे राहून मजुरी करतात.
आजीने मुलीच्या किंचाळ्या ऐकल्या
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत दहा वर्षांच्या मुलीच्या पालकांनी प्रसाद अर्पण करण्याच्या बहाण्याने शेजारी सविथ्रम्मा आणि सौम्या आपल्या मुलीला जवळच्या शेतात नेल्याचा आरोप केला. मुलीने तिच्या पालकांना सांगितले की, त्यांनी जबरदस्तीने हार घालून काही धार्मिक विधी करण्यास सुरूवात केली. तथापि, तिच्या आजीच्या लक्षात आले की, १० वर्षांची मुलगी हरवली आहे. आजी तिला शोधू लागली आणि तिने शेतातून तिच्या किंकाळ्या ऐकल्या.
पाचही आरोपी मुलीने काही विशिष्ट विधी केल्यामुळे तेथे हजर असल्याचे पोलिसांनी महिलेला सांगितले. तक्रारीत असे सांगितले गेले आहे की, मुलीची सुटका झाली आणि तिने घटनेबाबत सांगितले. ज्यात असे सूचित होते की, आरोपी तिचा बळी देण्याचा प्रयत्न करीत होते.
या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आणि चौकशीदरम्यान त्यांनी असा दावा केला की, त्यांनी मुलीला एका सोहळ्यासाठी शेतात आणले होते. पुढे आरोपींनी सांगितले की, त्यांना त्यांच्या शेतात मंदिर बांधायचे आहे आणि पुजार्याने एका अल्पवयीन मुलीला पूजा करण्यास सांगितले होते. दरम्यान, आरोपींनी तक्रार मागे घेण्याची धमकी देत असल्याने त्यांनी हा गुन्हा शनिवारी दाखल केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला. पोलिसांनी जबाबात अशी नोंद केली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले.
मोटारसायकलचे मोडीफाय केलेले ९३ सायलेन्सर रोलरखाली, १ लाख ३२ हजाराचा दंड वसूलhttps://t.co/xm4vmwojaM
— Lokmat (@MiLOKMAT) June 21, 2021