संतप्त पत्नीनं पतीला जिवंत जाळलं; त्यातूनही ‘तो’ बचावल्यावर प्रियकरानं दगडानं ठेचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 03:51 PM2021-09-14T15:51:46+5:302021-09-14T16:04:08+5:30

नारायणप्पा यांच्या पत्नी अन्नपूर्णा ज्या ३६ वर्षाच्या आहेत. त्यांचे परिसरातील ३५ वर्षीय रामकृष्ण नावाच्या एका चित्रकारासोबत विवाहबाह्य संबंध होते.

Karnataka woman sets husband afire, drops boulder on him to ensure he's dead | संतप्त पत्नीनं पतीला जिवंत जाळलं; त्यातूनही ‘तो’ बचावल्यावर प्रियकरानं दगडानं ठेचलं

संतप्त पत्नीनं पतीला जिवंत जाळलं; त्यातूनही ‘तो’ बचावल्यावर प्रियकरानं दगडानं ठेचलं

googlenewsNext
ठळक मुद्देएकेदिवशी अन्नापूर्णाच्या विवाहबाह्य संबंधावरुन नारायणप्पा आणि तिच्यात जोराचं भांडण झालंआग लागताच नारायणप्पा त्याच अवस्थेत घराच्या बाहेर पडला आणि जवळील एका नाल्यात जाऊन पडला. घटनेच्या वेळी नारायणप्पा आणि अन्नापूर्णा यांच्या ३ मुलीही घरीच उपस्थित होत्या.

बंगळुरु – कर्नाटकच्या तुमकुरु जिल्ह्यात बद्दीहल्ली येथील परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. याठिकाणी एका महिलेने स्वत:च्या पतीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं पण त्यात तो बचावल्यानंतर पत्नीच्या प्रियकराने दगडाने डोकं ठेचून त्याची हत्या केली. हा घटना समोर येताच परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना कळवल्यावर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सर्वात हैराण करणारा प्रकार म्हणजे दिवसाढवळ्या पतीला जाळण्याचा प्रयत्न केला गेला. यात मृत पतीचं नाव नारायणप्पा होतं. ते ५२ वर्षांचे होते. नारायणप्पा एका खासगी कंपनीत इलेक्ट्रिशियन म्हणून कामाला होते. नारायणप्पा यांच्या पत्नी अन्नपूर्णा ज्या ३६ वर्षाच्या आहेत. त्यांचे परिसरातील ३५ वर्षीय रामकृष्ण नावाच्या एका चित्रकारासोबत विवाहबाह्य संबंध होते. रामकृष्णा व्याजावर कर्जाचे पैसे देऊन त्यातून कमाई करत होता. नारायणप्पा आणि अन्नापूर्णा यांच्यात रामकृष्णवरुन वारंवार भांडण होत असे.

केसात लावलेल्या पिननं वाचवला जीव; चौथी वर्गातील मुलीचा धाडसी प्रताप, काय आहे प्रकरण?

एकेदिवशी अन्नापूर्णाच्या विवाहबाह्य संबंधावरुन नारायणप्पा आणि तिच्यात जोराचं भांडण झालं. हा वाद इतका टोकाला गेला की पत्नीचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात अन्नापूर्णाने पती नारायणप्पावर पेट्रोल टाकलं आणि त्याला आग लावली. तेव्हा रामकृष्णा हादेखील तिथे हजर होता. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागताच नारायणप्पा त्याच अवस्थेत घराच्या बाहेर पडला आणि जवळील एका नाल्यात जाऊन पडला. त्यामुळे त्याच्या शरीराला लागलेली आग विझली. परंतु जेव्हा तो नाल्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा रामकृष्णाने त्याचं डोकं दगडाने ठेचले. या त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नारायणप्पाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर बद्दीहल्ली परिसरात मोठी खळबळ माजली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यावेळी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अन्नापूर्णा आणि रामकृष्णा यांना अटक केली. घटनेच्या वेळी नारायणप्पा आणि अन्नापूर्णा यांच्या ३ मुलीही घरीच उपस्थित होत्या. यातील सर्वात मोठी मुलगी १४ वर्षाची आहे. जी तिच्या वडिलांच्या हत्येची प्रमुख साक्षीदारही आहे. तर जेव्हा ही घडली तेव्हा १२ वर्षाच्या दोन जुळ्या मुली एका रुममध्ये होत्या.

Web Title: Karnataka woman sets husband afire, drops boulder on him to ensure he's dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस