पोटनिवडणूक: चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार- भाजपा समर्थक भिडले; पोलिसांसमोरच हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 11:05 AM2023-02-26T11:05:08+5:302023-02-26T11:05:35+5:30
सांगवी परिसरातील मतदान केंद्रावर ही हाणामारीची घटना घडली आहे. पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत दोन्ही गटाला बाजुला केले आहे.
पुण्यात कसबा आणि चिंचवड मतदारसंघांत पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु झाले आहे. मोठमोठ्या हे दोन्ही मतदारसंघ पिंजून काढले आहेत. ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. असे असताना प्रचारावेळी तापलेल्या वातावरणाचे पडसाद मतदानादिवशी दिसून आले आहेत. चिंचवडमध्ये सकाळी सकाळीच अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांत आणि भाजपाच्या माजी नगरसेवकांत हाणामारीचा प्रकार घडला आहे.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे समर्थक गणेश जगताप आणि भाजपाचे माजी नगरसेवक सागर अंघोळकर यांच्यात हाणामारी झाली आहे. सांगवी परिसरातील मतदान केंद्रावर ही हाणामारीची घटना घडली आहे. पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत दोन्ही गटाला बाजुला केले आहे.
चिंचवडमध्ये सांगवी भागात हाणामारी.... पोटनिवडणुकीच्या मतदानाला गालबोट #Byelection#ChinchwadByElection#ChinchwadVidhansabhahttps://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/MZPYlKWswA
— Lokmat (@lokmat) February 26, 2023
मतदान केंद्रावर शंभर मीटरच्या आत का थांबले असा सवाल जगताप यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना केला. यामुळे हा वाद सुरु झाला. याची परिणीत हाणामारीत झाली. संबंधित प्रकाराबाबत तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल आणि शहरात सुरळीत मतदान सुरू असल्याचा दावा पोलीस आयुक्त काकासाहेब डोळे यांनी केला.