Kashmir Target Killing : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी तालिबला बंगळुरू येथून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 03:42 PM2022-06-07T15:42:35+5:302022-06-07T15:44:12+5:30

Kashmir Target Killing : सुरक्षा दलांनी त्याचा शोध मोहीम तीव्र केली होती. तेव्हा तो बंगळुरूमध्ये लपून बसला होता.

Kashmir Target Killing: Hizbul Mujahideen terrorist Taliban arrested from Bangalore | Kashmir Target Killing : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी तालिबला बंगळुरू येथून अटक

Kashmir Target Killing : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी तालिबला बंगळुरू येथून अटक

googlenewsNext

बंगळुरू : जम्मू-काश्मीर पोलीस (Jammu kashmir police), कर्नाटक पोलीस (Karnataka Police) आणि भारतीय लष्कराच्या 17 राष्ट्रीय रायफल्सच्या पथकाने हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला बंगळुरू येथून अटक (Arrest)  केली आहे. ही कारवाई ५ जून रोजी झाली. तालिब हुसैन नावाच्या या दहशतवाद्याचा काश्मीर खोऱ्यात स्थलांतरित आणि हिंदूंच्या टार्गेट केलेल्या हत्येत सहभाग असल्याचा संशय आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिब हुसैन पत्नी आणि मुलांसह जम्मू-काश्मीरमधून पळून गेला होता. सुरक्षा दलांनी त्याचा शोध मोहीम तीव्र केली होती. तेव्हा तो बंगळुरूमध्ये लपून बसला होता.

तालिबने येथील श्रीरामपुरा येथील मशिदीत आश्रय घेतला होता आणि तो शुक्रवारच्या नमाजच्या वेळी धार्मिक प्रवचन देत असे. बंगळुरूमध्ये दहशतवाद्याच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, "ही एक सतत प्रक्रिया आहे. लोकांच्या हालचालींवर पोलिसांची नजर राहणार आहे. आमच्या पोलिसांनी मदत केली. यापूर्वी भटकळमध्येही अटक झाली होती. आता जम्मू-काश्मीर पोलिसांनी बंगळुरूमध्ये अटक केली आहे. आमच्या पोलिसांनी त्यांना यात मदत केली आहे.

अहवालानुसार, 5 जून रोजी पकडलेला दहशतवादी तालिब हुसैन हा जम्मूच्या किश्तवाड जिल्ह्यातील नागसेनी तहसीलमधील रासगवारीचा रहिवासी आहे. तो २०१६ मध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. सुरक्षा दलांच्या हिटलिस्टवर राहूनही तालिब सर्वाधिक काळ जिवंत राहिला. स्थानिक गुर्जर जमातीतील तालिब यांना डोंगरदऱ्यांची जाण आहे. याआधी सोमवारी जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग म्हणाले होते की, खोऱ्यात आतापर्यंत 47 दहशतवाद्यांचे मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.


काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी मंगळवारी एनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'राहुल भटच्या हत्येत दोन दहशतवादी सामील होते. त्यापैकी एकाचा खात्मा केला, तर एक शिल्लक आहे. अमरीन भट हत्या प्रकरणात २ दहशतवाद्यांची ओळख पटली होती. दोघांचाही मृत्यू झाला आहे. राजस्थानचे रहिवासी बँक कर्मचारी विजय कुमार बेनिवाल यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यांनाही लवकरच अटक केली जाईल.
 

Web Title: Kashmir Target Killing: Hizbul Mujahideen terrorist Taliban arrested from Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.