काविळीने त्रस्त पोलिसाने राहत्या घरी गळफास लावून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 07:11 PM2018-11-26T19:11:32+5:302018-11-26T19:12:37+5:30
काही दिवसांपासून विनोद जाधव काविळीने त्रासलेले होते अशी माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वरपे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
मुंबई - माहीम पोलीस ठाण्यात कार्यरत होते असलेले पोलीस अंमलदार विनोद जाधव (वय २७) यांनी रात्री राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. वरळी येथील पोलीस कॅम्प सी - ४ येथे विनोद आपल्या आईसह राहत होता. तो अविवाहित होता. मात्र काही दिवसांपासून विनोद जाधव काविळीने त्रासलेले होते अशी माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वरपे यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यामुळे ते रजेवर होते.
काल रात्री वरळी पोलीस कॅम्पातील राहत्या घरी पंख्याला रस्सीने गळफास घेत आत्महत्या केली. आईने दरवाजा उघडून पहिला तेव्हा घडलेला प्रसंग तिला कळला. त्यानंतर वरळी पोलीस घटनास्थळी पोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनास्थळी सुसाईट नोट आढळून आलेली नाही असे पुढे वरपे यांनी सांगितले. विनोद यांची याआधी पहिली पोस्टिंग नायगाव येथे राखीव दलात कार्यरत होते. नंतर त्यांची पोस्टिंग माहीम पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.