सामान जपून ठेवा; रेल्वेत पकडले 11 हजार चोर, आरपीएफ जवानांची वर्षभरात कौतुकास्पद कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 08:05 AM2023-01-29T08:05:19+5:302023-01-29T08:05:34+5:30
Crime News; दैनंदिन कामासाठी बाहेर पडलेले असो किंवा निवांतपणी करावयाचा दूरवरचा प्रवास, रेल्वे हा सर्वांसाठी योग्य आणि स्वस्त पर्याय. दररोज विविध सेवांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. परंतु, सर्वांच्या सुरक्षित प्रवासाचे आव्हान रेल्वे लिलया पेलते.
मुंबई : दैनंदिन कामासाठी बाहेर पडलेले असो किंवा निवांतपणी करावयाचा दूरवरचा प्रवास, रेल्वे हा सर्वांसाठी योग्य आणि स्वस्त पर्याय. दररोज विविध सेवांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. परंतु, सर्वांच्या सुरक्षित प्रवासाचे आव्हान रेल्वे लिलया पेलते. प्रवाशांची लुबाडणूक करणाऱ्यांचा बंदोबस्त रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) जवान करतात. वर्षभरातील त्यांची कामगिरी कौतुकास्पदच आहे.
ऑपरेशन नार्कोस : रेल्वेमार्गे ड्रग्जची तस्करी रोखण्यासाठी आरपीएफने ऑपरेशन नार्कोस सुरू केले आहे. वर्षभरात १,०८१ ड्रग्ज तस्करांना गजाआड करीत त्यांच्याकडून ८० कोटी किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे.
मानवी तस्करीवर वचक
७४० केंद्रे मानवी तस्करी रोखण्यासाठी रेल्वेने विविध ठिकाणी उभारली आहेत. यासाठी नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या ‘बचपन बचाओ आंदोलन’सोबत करार केला आहे.