Ketaki Chitale : केतकी चितळेला दिलासा नाहीच, कोर्टाने जामीन अर्जावरील निर्णय ठेवला राखून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 06:36 PM2022-05-18T18:36:43+5:302022-05-18T18:37:42+5:30
Ketaki Chitale : तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कोर्ट निर्णय देणार आहे.
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महत्वाची बाब म्हणजे ठाणे न्यायालयात केतकीच्या सुनावणीवेळी गोरेगाव पोलीस देखील तिचा ताबा घेतला आहे. तर दुसरीकडे ठाणे सत्र न्यायालयात केतकीच्या जामीन अर्जावर सुनावणी आज दुपारी सुरु झालाय. मात्र, केतकी चितळेला दिलासा मिळालेला नाही. केतकीच्या जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला आहे. तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कोर्ट निर्णय देणार आहे.
शरद पवार यांच्या बाबतीत आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकणारी अभिनेत्री केतकी चितळे हिची आज पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. तिच्या बाबतीत या पूर्वीच मुंबईच्या गोरेगाव पोलिसांनी ताबा मागितल्यावर त्यांना ताबा दिला होता. पोलिसांना केतकीच्या जामिनाबाबत ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे सांगावे असं न्यायालयाने सांगितलं आहे. तोपर्यंत जामीन अर्जावर सुनावणी होणार नव्हती. केवळ सायबर कलम ६६ अ अन्वये युक्तिवाद झाला आहे. केतकीचे वकील घनश्याम उपाध्याय यांनी बाजू मांडली.
केतकी चितळेची जे जे रुग्णालयात वैद्यकीय चाचणी सुरु असून तिला डोकेदुखी आणि फिटचा त्रास असल्याने जे जे रुग्णालयात आहे. वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्याचा अहवाल घेऊन केतकीला पोलीस ताब्यात घेऊन चौकशी करू शकतात. मात्र, आज तरी ठाणे कोर्टाकडून केतकीला दिलासा मिळाला नसून तिच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात आला आहे.