खाकीला काळिमा! पानटपरीवाल्याकडून पोलिसाने घेतली २ हजारांची लाच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 09:29 PM2018-11-22T21:29:24+5:302018-11-22T21:29:44+5:30
साकीनाका येथील गाळा नंबर 3, दीनदयाळ रेस्टॉरंट, सहारा हॉटेलजवळील पानटपरीजवळ एसीबीने सापळा रचून कांबळेला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.
मुंबई - ४० वर्षीय पानटपरी व्यावसायिकाकडून पानटपरी व राहत्या घरी गुटखा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करू अशी धमकी देऊन साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस विद्याधर कांबळेने पानटपरी चालकाकडून 3,000 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 2,000 रुपये ठरली. त्यानंतर पानटपरी व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे (एसीबी ) याबाबत तक्रार केली. नंतर साकीनाका येथील गाळा नंबर 3, दीनदयाळ रेस्टॉरंट, सहारा हॉटेलजवळील पानटपरीजवळ एसीबीने सापळा रचून कांबळेला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.
मुंबई - पानटपरी चालकाकडून २ हजारांची लाच घेताना साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस विद्याधर कांबळेला अटक
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) November 22, 2018