खारघरच्या भाजपा नागरसेवकाविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 05:41 AM2018-08-14T05:41:40+5:302018-08-14T05:41:52+5:30

खारघर सेक्टर ४ मधील एका हॉटेल व्यावसायिकाला खंडिणीसाठी मारहाण केल्याच्या तक्रारीवरून भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्यावर खारघर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 Kharghar filed a complaint against BJP's Corporater | खारघरच्या भाजपा नागरसेवकाविरोधात गुन्हा दाखल

खारघरच्या भाजपा नागरसेवकाविरोधात गुन्हा दाखल

Next

पनवेल : खारघर सेक्टर ४ मधील एका हॉटेल व्यावसायिकाला खंडिणीसाठी मारहाण केल्याच्या तक्रारीवरून भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्यावर खारघर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. व्यावसायिकाला मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. इम्तियाज यांनी १ मेपासून हॉटेल सुरु केले होते. स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी हॉटेल व्यविस्थत सुरु ठेवण्यासाठी महिन्याला ५० हजार देण्याची मागणी केली. यावेळी इम्तियाज यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने काकडे यांनी हा राग मनात धरून १० आॅगस्ट रोजी हल्ला केल्याची तक्रार इम्तियाज शेख यांनी केली. पार्किंगचे कारण पुढे करून मला मारहाण केल्याचा आरोप यावेळी हॉटेल मालकांनी केली आहे . या प्रकरणात नगरसेवकासह इतर दहा साथीदार फरार आहेत. खारघर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार हे अधिक तपास करीत आहेत .

Web Title:  Kharghar filed a complaint against BJP's Corporater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.