पूर्ववैमनस्यातून अपहरण करून तरुणाचा खून; आळंदी पोलिसांनी केली दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 10:26 PM2022-02-16T22:26:53+5:302022-02-16T22:28:06+5:30

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि लक्ष्मण शिंदे यांचे भांडण झाले होते.

Kidnap and murder in Pimpri; Alandi police arrested two person | पूर्ववैमनस्यातून अपहरण करून तरुणाचा खून; आळंदी पोलिसांनी केली दोघांना अटक

पूर्ववैमनस्यातून अपहरण करून तरुणाचा खून; आळंदी पोलिसांनी केली दोघांना अटक

googlenewsNext

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून तरुणाचे अपहरण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोयाळी भानोबाची (ता. खेड) हद्दीत काळेवस्ती भागातून १३ फेब्रुवारीला तरुणाचे अपहरण केले होते. त्याचा मृतदेह बुधवारी (दि. १६) भीमा नदी पात्रात निकम वस्ती, कोयाळी येथे आढळून आला. 

लक्ष्मण यशवंत शिंदे (वय ३१), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुनील जयवंत पांढरे, कोंडीबा लहू काळे (दोघेही रा. काळेवस्ती, कोयाळी, ता. खेड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह संतोष लहू काळे, शिवाजी पांडुरंग कोळेकर (दोघेही रा. काळेवस्ती, कोयाळी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मयत तरुण लक्ष्मण शिंदे यांची पत्नी सुनीता लक्ष्मण शिंदे (वय २७, रा. काळे वस्ती, कोयाळी तर्फे चाकण, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि लक्ष्मण शिंदे यांचे भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून आरोपींनी लक्ष्मण शिंदे यांना १३ फेब्रुवारी रोजी दुचाकीवर बसवून अपहरण केले. याबाबत लक्ष्मण शिंदे यांच्या पत्नीने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी सुनील पांढरे आणि कोंडीबा काळे या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींनी लक्ष्मण शिंदे यांचे अपहरण करून लोखंडी राॅडने मारहाण करून त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह भीमा नदीपात्रात टाकून दिला, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी शोध घेतला असता भीमा नदीपात्रात लक्ष्मण शिंदे यांचा मृतदेह मिळून आला. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Kidnap and murder in Pimpri; Alandi police arrested two person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.