कर्ज फेडण्याची तारीख आली अन् एक दिवस आधीच पत्नी पोलीस ठाण्यात...म्हणाली पती गायब!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 01:55 PM2022-01-30T13:55:53+5:302022-01-30T13:56:30+5:30

कर्जात बुडालेल्या एका गॅस एजन्सीच्या मालकानं स्वत:ला वाचविण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा खोटा डाव रचला. पण पोलिसांनी अतिशय हुशारीनं संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.

kidnap fake conspiracy 42 lakhs loan police kaimur bihar | कर्ज फेडण्याची तारीख आली अन् एक दिवस आधीच पत्नी पोलीस ठाण्यात...म्हणाली पती गायब!

कर्ज फेडण्याची तारीख आली अन् एक दिवस आधीच पत्नी पोलीस ठाण्यात...म्हणाली पती गायब!

Next

कैमूर-

कर्जात बुडालेल्या एका गॅस एजन्सीच्या मालकानं स्वत:ला वाचविण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा खोटा डाव रचला. पण पोलिसांनी अतिशय हुशारीनं संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. बिहारच्या कैमूर येथे हा प्रकार घडला आहे. १४ जानेवारी रोजी रोहतास जिल्ह्यातील कोचस ठाणे हद्दीतील कथराईच्या महेंद्र प्रताप यांच्या अपहरणाची तक्रार त्यांची पत्नी १५ जानेवारी रोजी मोहनिया ठाण्यात नोंदवली होती. 

पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत कथराई गॅस एजन्सीचे मालक धर्मेंद्र प्रताप यांना वाराणसी येथून सुखरुपरित्या सोडवलं. चौकशी दरम्यान पोलिसांना धर्मेंद्र प्रताप यांच्यावर ४२ लाखांचं कर्ज असल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे हे कर्ज १५ जानेवारी रोजी फेडण्याची तारीख होती. यापासून स्वत: बचाव व्हावा यासाठी त्यानं एक दिवस आधी म्हणजेच १४ जानेवारी रोजी स्वत:च्या अपहरणाचा खोटा डाव रचला. दुसऱ्या दिवशी कर्जाची रक्कम वसुल करण्यासाठी धर्मेंद प्रताप यांच्या घरी अधिकारी दाखल झाले असता त्यांच्या पत्नीनं धर्मेंद्र प्रधान गायब असल्याचं म्हटलं. तसंच पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवली. पण पोलिसांसमोर काही प्रधान यांचा बोगसपणा जास्त दिवस टीकू शकला नाही आणि धर्मेंद्र प्रधान यांचा वाराणीतून त्यांच्याच कुटुंबीयांच्या घरातून शोध लावला गेला. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. 

गॅस एजन्सीच्या मालकावर ४२ लाखांचं कर्ज
धर्मेंद्र प्रताप हे रोहतास जिल्ह्याच्या कोचस ठाणे हद्दीतील कथराई येथील रहिवासी आहेत. गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी त्यांनी कर्ज घेतलं होतं. कर्जाची मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज मिळून ४२ लाख रुपये थकबाकी झाली होती. पण त्याची परतफेड करण्यासाठी प्रधान यांच्याकडे पैसे नव्हते. 

Web Title: kidnap fake conspiracy 42 lakhs loan police kaimur bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.