इस्टेट एजंटचे केले अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:00 AM2019-08-25T00:00:07+5:302019-08-25T00:00:10+5:30
नालासोपाऱ्याची घटना । चौघांवर गुन्हा दाखल
नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात राहणारा व इस्टेट एजंटचा व्यवसाय करणाºया ३० वर्षीय तरुणाचे पैशासाठी अपहरण केल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणाच्या तक्रारीवरून तुळींज पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्कया इमारतीच्या सदनिका नंबर क्यू/२०२ मध्ये धीरज घनश्याम दुबे (३०) हा राहत असून तो इस्टेट एजंटचा व्यवसाय करतो. ८ आॅगस्टला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास त्याच्या घरी भारत भोकरे आणि जितेंद्र म्हात्रे नावाचे दोघे आले. घराबाहेर बोलण्यासाठी धीरज आल्यावर त्याला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करत इमारतीच्याखाली आणून गाडीत कोंबले. अपहरण करून कळवा याठिकाणी आणले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी केली जात आहे.
पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी
वाटेत त्याला शिवीगाळ व मारहाण करून घरच्यांना फोन लावून ५ लाख रुपये घेऊन येण्यास सांग अन्यथा तुला जीवे मारण्याची धमकी दिली. ठाणे येथेच राहणारे दिनेश कुशवाह यांच्याकडून ७ लाख रूपये धीरजला येणे बाकी होते. म्हणून त्यांना अपहरण ठिकाणी बोलावून येणारे पैसे भारत आणि जितेंद्र याला दे असे जबरदस्तीने सांगण्यास प्रवृत्त केले. घडलेली हकीकत धीरजने तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन सांगितल्यावर शुक्र वारी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसाची बतावणी करून वृद्धेला लुटले
नालासोपारा : पूर्वेकडील सेंट्रल पार्कयेथील अंबिका टेलर्सच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरील कोपºयावर शुक्र वारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ६४ वर्षीय महिलेला दोन चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याचा प्रकार घडला आहे. तुळींज पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वंदना दत्ता सकपाळ (६४) या शुक्रवारी सकाळी शिवण्यासाठी दिलेले कपडे घेण्यासाठी गेल्या असता शिवून झाले नसल्याने घरी परतत असताना पाठीमागून आलेल्या दोन चोरट्यांनी पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून लुटले. ३० हजारांची माळ काढून हातचलाखी करून चोरून पळून गेले.