प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण केले; बसपाच्या माजी खासदाराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 11:24 PM2020-05-11T23:24:13+5:302020-05-11T23:26:11+5:30

कारागृह अधीक्षकांना या आजाराशी संबंधित अर्ज पाठवून उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करण्यास सांगितले आहे, असे त्यांनी सांगितले. 

Kidnapped project officer; Former BSP MP arrested pda | प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण केले; बसपाच्या माजी खासदाराला अटक

प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण केले; बसपाच्या माजी खासदाराला अटक

Next
ठळक मुद्देलाईन बाजार पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस कालिकुट्टीचे माजी खासदार यांच्या निवासस्थानी पोहोचले. दोघांनाही कोर्टात हजर राहण्यासाठी लाईन बाजार पोलिस ठाण्यात कडक सुरक्षेत ठेवण्यात आले होते.

जौनपूर शहरातील पचहटिया येथील निर्माणाधीन सीव्हर ट्रीटमेंट प्लांटच्या प्रकल्प व्यवस्थापकाचे बसपाचे माजी खासदार आणि बाहुबली धनंजय सिंह, त्यांचे निकटवर्तीय विक्रम सिंह यांच्यासह चार जणांनी अपहरण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल आहे. लाईन बाजार पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस कालिकुट्टीचे माजी खासदार यांच्या निवासस्थानी पोहोचले. या माजी खासदाराला तेथून अटक करण्यात आली. त्याचबरोबर दुसरा आरोपी विक्रम सिंग यालाही अटक करण्यात आली.

दोघांनाही कोर्टात हजर राहण्यासाठी लाईन बाजार पोलिस ठाण्यात कडक सुरक्षेत ठेवण्यात आले होते. रिमांड दंडाधिका्याने धनंजय सिंग यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी, आजार असल्याचा युक्तिवाद करत माजी खासदाराने दिलासा मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला दंडाधिकाऱ्यांनी नकार दिला. कारागृह अधीक्षकांना या आजाराशी संबंधित अर्ज पाठवून उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करण्यास सांगितले आहे, असे त्यांनी सांगितले. 
 

Coronavirus : मुंबई पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर, वाढवले पोलिसांचे मनोबल 

 

CoronaVirus News : धक्कादायक! २४ तासांत राज्यभरात २२१ पोलिसांना कोरोनाची बाधा

कोर्टाबाहेर धनंजय सिंह यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारचे मंत्री गिरीशचंद यादव यांनी कराराच्या वादात वैयक्तिक कट रचल्याचा आरोप केला. यासह त्यांनी एसपी देखील या काटकारस्थानात हात आहे. शहरातील पचहटिया भागात कोट्यवधींच्या खर्चाने सीव्हर ट्रीटमेंट प्लांटचे बांधकाम सुरू आहे. कार्यकारी महामंडळ जल निगम यांनी मुझफ्फरनगरच्या सिंघल ग्रुपला बांधकाम करण्याचे काम सोपवले आहे. कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक अभिनव सिंघल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, विक्रम सिंह दोन लोकांसह ४ मे रोजी त्यांच्या ठिकाणी आला आणि गाडीत जबरदस्तीने टाकले आणि धनंजयसिंग यांच्या घरी घेऊन गेला. तेथे धनंजयसिंग यांनी पिस्तूलने धाक दाखवून धमकी दिली. धनंजय सिंह, त्याचा जवळचा मित्र विक्रम सिंग आणि इतर दोन जणांविरोधात अपहरण, धमकी, प्राणघातक हल्ला यासह इतर कलमांअंतर्गत तक्रारीच्या आधारे लाइन बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्री उशिरा शहरातील कालीकुट्टी येथील निवासस्थानी पोहोचल्यानंतर पोलिसांनी माजी खासदारास अटक केली.

लाइन बाजारा पोलीस ठाण्याचे एसओ दिनेशकुमार पांडे म्हणाले की, तक्रारीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सीओ सिटी सुशील कुमार सिंह यांनी अटकेची कारवाई केली. प्रकल्प व्यवस्थापकाचे अपहरण करुन त्यांना धमकावल्याप्रकरणी माजी खासदाराविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

Web Title: Kidnapped project officer; Former BSP MP arrested pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.