25 लाखांची खंडणी मागणाऱ्या पाच अपहरणकर्त्यांना ठाेकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 04:15 PM2021-10-01T16:15:13+5:302021-10-01T20:22:35+5:30

kidnapping Case : पुण्यातील अपहरण झालेले दिरंबर चिताेडीया यांची सुटका; रायगड पाेलिसांची कारवाई     

The kidnappers were handcuffed after demanding a ransom of Rs 25 lakh | 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या पाच अपहरणकर्त्यांना ठाेकल्या बेड्या

25 लाखांची खंडणी मागणाऱ्या पाच अपहरणकर्त्यांना ठाेकल्या बेड्या

googlenewsNext
ठळक मुद्देवामन मारुती शिंदे (39), बदलापूर, याेगेंद्र प्रसाद (25) अंबरनाथ,दिलीप पासवान (32), धुरुपचंद यादव (33), संदीप प्रकाश साेनावणे (35) सर्व राहणार अंबरनाथ अशी अपहरणकर्त्यांची नावे आहेत.         30 सप्टेंबर 21 राेजी खाेपाेली पाेलिस रात्री गस्त घालत हाेते. त्यावेळी त्यांना एक अल्टाे कार दिसून आली.

रायगड ः रात्री गस्त घालत असताना खाेपाेली पाेलिसांनी पाच अपहरणकर्त्यांना बेड्या ठाेकल्या आहेत. तसेच 25 लाखांची खंडणीची मागणी करुन उपहरण केलेल्या व्यक्तीचीही पाेलिसांनी सुटका केली आहे. सदरच्या पाचही आराेपींना हिंजवडी पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, तसेच अपहरण झालेले दिगंबर इंदलसिंग चिताेडीया यांनाही पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. वामन मारुती शिंदे (39), बदलापूर, याेगेंद्र प्रसाद (25) अंबरनाथ,दिलीप पासवान (32), धुरुपचंद यादव (33), संदीप प्रकाश साेनावणे (35) सर्व राहणार अंबरनाथ अशी अपहरणकर्त्यांची नावे आहेत.                                    

30 सप्टेंबर 21 राेजी खाेपाेली पाेलिस रात्री गस्त घालत हाेते. त्यावेळी त्यांना एक अल्टाे कार दिसून आली. त्या कारच्या दाेन्ही नंबर प्लेटवर चिखल लावण्यात आल्याचे आढळून आले. सहायक पाेलिस निरीक्षक  हरेश काळसेकर, पाेलिस शिपाई आर.एस.मासाळ आणि एस.ए. तांबे यांना संशय आला. त्यांनी कारमधील व्यक्तींची चाैकशी सुरु केली. तेव्हा पाच जणांनी नाव,पत्ता आणि माेबाईल क्रमांक सांगितला, तसेच अधिक सखाेल चाैकशी करताना उडवा-उडवीची उत्तरे दिली. अन्य एक व्यक्तीही त्यांच्यासाेबत हाेती. त्याची चाैकशी केली असता त्यांनी त्याचे नाव दिगंबर इंदलसिंग चिताेडीया रा मुळशी, पुणे असे सांगितले, तसेच मला वाचवा संबंधीतांनी माझे अपहरण केले आहे. गेल्या दाेन दिवसांपासून त्यांनी मला अंबरनाथ येथे डांबून ठेव्याचे सांगितले. त्यांनतर पाेलिस सर्वांना घेऊन खाेपाेली पाेलिस ठाण्यात आले. अधिक चाैकशी केल्यानंतर हिंजवडी पाेलिस ठाण्यामध्ये अपहरण आणि 25 लाख रुपयांची खंडणी मागणे याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उघड झाले.खाेपाेली पाेलिसांनी अपहरण झालेले दिगंबर आणि पाचही आराेपींना हिंजवडी पाेलिसांच्या ताब्यात दिले.                                                                                                                                ----                                                                                                                                                    

दिगंबर चिताेडीया हे पुण्यातील प्रसिध्द आैषध व्यावसायिक आहेत. दिगंबर यांचे आजाेबा-पंजाेबा हे राजे-राजवाड्यांना औषधे पुरवत असत. पुढे त्यांनीही ताेच व्यवसाय सुरु ठेवला आहे, अशी माहिती खाेपाेली पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी लाेकमतशी बाेलताना दिली. 

Web Title: The kidnappers were handcuffed after demanding a ransom of Rs 25 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.