अपहरणप्रकरणी वकिलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 03:18 AM2018-08-03T03:18:01+5:302018-08-03T03:18:24+5:30

दिव्यातील सुरेंद्र मिश्रा (२६) याच्या अपहरणप्रकरणी नारायण नागरगोजे या वकिलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील भास्कर नारंगीकर (६७, रा. पाळपादेवी पाडा, मुलुंड) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट -१ ने बुधवारी अटक केली.

 In the kidnapping case, four of the accused, | अपहरणप्रकरणी वकिलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अपहरणप्रकरणी वकिलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

ठाणे : दिव्यातील सुरेंद्र मिश्रा (२६) याच्या अपहरणप्रकरणी नारायण नागरगोजे या वकिलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील भास्कर नारंगीकर (६७, रा. पाळपादेवी पाडा, मुलुंड) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट -१ ने बुधवारी अटक केली. त्याला ४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
सुरेंद्रचे मुंबईच्या नाहूर रोड येथील एका चोवीसवर्षीय तरुणीवर प्रेम होते. या प्रेमसंबंधाला तिच्या वडिलांचा विरोध होता. त्यांचे लग्नही होणार होते. १९ जुलै रोजी तो दिव्यातच भाड्याने रूम घेण्यासाठी बाहेर पडला होता. परंतु, त्याचवेळी ठाण्याच्या तीनहातनाका येथून त्याचे अपहरण झाले. त्याला एका गाडीतून नेण्यात आले. नारंगीकर यांच्या घरातच त्याला मारहाणही झाली. त्यानंतर मात्र तो गायब झाला. याबाबत सुरुवातीला नौपाडा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. परंतु, त्याचा पयासीपूर (उत्तर प्रदेशातील) येथील भाऊ वीरेंद्र मिश्रा याने या संपूर्ण प्रकरणात संशय व्यक्त करून त्याचे अपहरण झाल्याची तक्रार २९ जुलै २०१८ नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली.

नागरगोजे यांनी ठाणे न्यायालयातून या प्रकरणात गुरुवारी अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवला आहे. त्यांना चौकशीसाठी बोलवले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यातील अन्यही आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title:  In the kidnapping case, four of the accused,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा