'त्या' मोठ्या बहीणीला प्रियकरासोबत रहायचे होते, अपहरणाच्या प्रकरणाने घेतले वेगळेच वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 09:31 AM2021-09-19T09:31:25+5:302021-09-19T09:33:46+5:30

Crime News Uttar Pradesh: मॉर्निंग वॉकला तीन बहीण भावांसोबत गेलेली असताना छोट्या बहीणीची छेडछाड एका कारमधून आलेल्या तरुणींनी काढली. तिला आत ओढत असताना ही मोठी बहीण तिथे पोहोचली आणि तिने छोट्या बहीणीला त्या गुंडांपासून वाचविले. परंतू, गुंडांनी तिला पकडून गाडीत ओढून पसार झाले असा बनाव रचण्यात आला होता.

kidnapping Case: noida girl refuses to live with family court sends her lover house gonda | 'त्या' मोठ्या बहीणीला प्रियकरासोबत रहायचे होते, अपहरणाच्या प्रकरणाने घेतले वेगळेच वळण

'त्या' मोठ्या बहीणीला प्रियकरासोबत रहायचे होते, अपहरणाच्या प्रकरणाने घेतले वेगळेच वळण

googlenewsNext

ग्रेटर नोएडातील बादलपूर भागातील तरुणीच्या कथित किडनॅपिंग प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. या प्रकरणी नोएडा पोलिसांनी खोट्या प्रकरणात गुन्हा दाखल करायला लावून पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी त्या तरुणींवर गुन्हा दाखल केला आहे. छोट्या बहीणीची छेड काढण्यास गेलेल्या मोठ्या बहीणीलाच गुंडांनी पळविल्याचे हे प्रकरण आहे. यामुळे न्यायालयाने या मोठ्या बहीणीला तिच्या प्रियकराच्या संरक्षणात गोंडाला पाठविले आहे. ('That' older sister wanted to live with her boyfriend, the abduction case took a different turn.)

या तरुणीने त्यांनी रचलेल्या अपहरणाच्या स्टोरीचे बिंग फुटताच घरच्यांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे आणि अल्पवयीन नसल्याने प्रियकरासोबत रहायचे आहे, असे न्यायालयाला सांगितले. मॉर्निंग वॉकला तीन बहीण भावांसोबत गेलेली असताना छोट्या बहीणीची छेडछाड एका कारमधून आलेल्या तरुणींनी काढली. तिला आत ओढत असताना ही मोठी बहीण तिथे पोहोचली आणि तिने छोट्या बहीणीला त्या गुंडांपासून वाचविले. परंतू, गुंडांनी तिला पकडून गाडीत ओढून पसार झाले असा बनाव रचण्यात आला होता. या विरोधात संतप्त झालेल्या त्या गावच्या नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. 

अशा प्रकारे पोलिसांची फसवणूक आणि आंदोलन केल्या प्रकरणी 150 लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच न्यायालयाने या तरुणीला तिचा प्रियकर अनिमेष तिवारी सोबत तिला त्याच्या घरी पोलीस संरक्षणात पाठवून दिले आहे. अपहरण झाल्याप्रकरणी पोलिसांनी या दोघांना गोंडातून ताब्यात घेतले होते आणि शनिवारी ग्रेटर नोएडाच्या न्यायालयात हजर केले होते. 

Web Title: kidnapping Case: noida girl refuses to live with family court sends her lover house gonda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.